शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राष्ट्रीय भूमिकेतून घुमान संमेलनाकडे पाहू

By admin | Updated: March 3, 2015 01:23 IST

महाराष्ट्रातील दोन-चार साहित्यिक सोडले, तर इतरांच्या लेखनाविषयी महाराष्ट्राबाहेर कुणाला माहिती नाही.

पुणे : महाराष्ट्रातील दोन-चार साहित्यिक सोडले, तर इतरांच्या लेखनाविषयी महाराष्ट्राबाहेर कुणाला माहिती नाही. देशातील मराठी साहित्यिकांची नव्याने ओळख व्हावी, यासाठी महामंडळाने मराठी वाङ्मयीन नकाशा तयार करावा. राष्ट्रीय भूमिकेतून या संमेलनाकडे पाहू, असा सूर संमेलनाच्या आजी-माजी साहित्यिकांनी लावला.निमित्त होते घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्यानिमित्त संयोजन समितीच्या वतीने आजी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या परिसंवादास डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. राजेंद्र बनहट्टी, डॉ. द. भि. कुलकर्णी आणि नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सहभागी झाले होते. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘संतसाहित्याच्या अभ्यासकांना घुमानला जाण्याचा योग येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचे वंशज या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.’’डॉ. बनहट्टी म्हणाले, ‘‘संत नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घुमान येथे संमेलन होत आहे ही अपूर्व गोष्ट आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यातील समृद्ध परंपरा इतर भाषकांना होईल.’’देशातील मराठी लेखकांच्या साहित्यिची नव्याने ओळख व्हावी, स्मृती जागविल्या जाव्यात यासाठी मराठी वाङ्मयीन नकाशा तयार केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करून द. भि. कुलकर्णी म्हणाले, ‘‘साहित्य, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या घुमान हे फार महत्त्वाचे आहे. मराठीच्या भाषेबाबत चिंता व्यक्त केली जाते. पण, संत नामदेवांनी पंजाबी, हिंदी आणि मराठी अशा वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण करून मते व्यक्त केली आहेत.’’ (प्रतिनिधी)सांस्कृतिक, वाङ्मयीन क्षेत्रात संत नामदेवांचे कार्य मोठे आहे. नामदेवांनी पंजाबला शस्त्राने नव्हे, तर प्रेमाने जिंकले आहे. पंजाबी लोकांनीही त्यांना आपले मानले आहे. जेथे-जेथे मराठी लोकांचे साम्राज्य होते, तेथे-तेथे साहित्य संमेलने झाली आहेत. महाराष्ट्राकडे संकुचित प्रदेशवाद नाही. राष्ट्रीय भूमिकेतून या संमेलनाकडे पाहिले पाहिजे. संमेलनानिमित्त संत नामदेवांच्या स्मृतींचा जागर करू, त्यांच्या प्रेरणेजे जल घेऊन येऊ.- डॉ. सदानंद मोरे, नियोजित अध्यक्ष, घुमान साहित्य संमेलन