शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या अभिजात दर्जाप्रकरणी शिष्टमंडळाची त्वरीत कार्यवाही व्हावी, महामंडळाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:11 IST

मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे.

ठळक मुद्देएक उच्चाधिकार समिती विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावीप्रलंबित मागण्या, ठरावामध्ये बेळगाववासियांच्या सीमा प्रश्न संबंधातीलही ठरावाचा समावेश

पुणे : बडोदे येथे संमेलन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या डोंबिवली येथील संमेलनात ठराव संमत केला. या ठरावानुसार महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांकडे नेण्याची जी मागणी मान्य केली त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घातली आहे.शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवीत हे शासन त्याबाबत सकारात्मक आहे असे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याबाबतही आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरीत अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी, अशीही विनंती डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या, सूचना संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जी  थेट भेट महामंडळाने अनेक वर्षांपासून मागितली व जो पाठपुरावा महामंडळाने दोन वर्षांपासून चालवला आहे त्यालाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होईल असे जे जाहीर केले त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशीरात उशीरा ३० मार्च पूर्वी आयोजित करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंतीही या पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.या प्रलंबित मागण्या, ठरावामध्ये बेळगाववासियांच्या सीमा प्रश्न संबंधातीलही ठरावाचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास असून तो ते सार्थ ठरवतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे