शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या अभिजाततेचा निर्णय तातडीने व्हावा; महामंडळ अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:34 IST

बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. 

ठळक मुद्देडॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली विनंती वर्षानुवर्षे केला जाणारा पाठपुरावा याची दखल घेतली जात नसल्याची व्यथाही मांडली पत्रात

पुणे : बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. बडोद्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सर्व मराठी खासदार, आमदार, केंद्रातील मराठी मंत्री यांनी एकत्रितपणे पंतप्रधानांना विनंती करुन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्याची गळ घालावी, त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: वेळ काढून तातडीचे प्रयत्न करावेत, केवळ राज्य सरकारच्या अधिकारात असलेल्या मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा बडोदा संमेलनापूर्वी करावी, जेणेकरुन संमेलनात अभिनंदनाचा ठराव करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मराठीच्या अभिजात दर्जासाठी पत्रे, निवेदने, मागण्या, ठराव, वर्षानुवर्षे केला जाणारा पाठपुरावा याची दखल घेतली जात नसल्याची व्यथाही जोशी यांनी पत्रात मांडली आहे.९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केंद्राकडून मराठीला अभिजात दर्जाची घोषणा आणि राज्याकडून मराठी विद्यापीठ स्थापनेची घोषणा या पार्श्वभूमीवरच होईल, असे प्रयत्न करत मुख्यमंत्र्यांनी तडक कृती करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यासाठी केलेल्या ठरावांचा सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे स्मरण मुख्यमंत्र्यांना करुन देत, मराठीला अभिजात दर्जा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची आणि दिल्लीत जंतरमंतरवर त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वाला हे गा-हाणे मांडण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची विनंती ९० व्या साहित्य संमेलनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. त्याचेही स्मरण डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे करुन दिले आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस