आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र, जिल्हा परिषदेचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:40 AM2017-09-12T02:40:04+5:302017-09-12T02:40:21+5:30

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swine Flu Counseling Center, Zilla Parishad's decision in health center | आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र, जिल्हा परिषदेचा निर्णय 

आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र, जिल्हा परिषदेचा निर्णय 

Next

पुणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशन केंद्र उभारले आहेत. त्यामुळे विविध रोगाची लक्षणे, ताप, स्वाईन फ्ल्यू याबद्दल नागरिकांना माहिती मिळत आहे. तसेच समुपदेशन केंद्रामध्ये ताप सदृश्य रुग्ण आढळल्यास त्याच्या आजाराच्या पुढील तपासण्यासाठी रक्ताचे नमुने आणि इतर चाचण्या केल्या जात आहेत. तर स्वाईन फ्ल्यूग्रस्त रुग्णाला ४८ तासांच्या आतमध्ये टॅमीफ्ल्यू गोळी दिल्या जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितली.
ग्रामीण भागात नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, घसादुखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजिकच्या सरकारी दवाखान्यात भेट देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच कोणतेही औषध घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे केली आहे.
लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया, अस्थमा तसेच मधुमेह आणि रक्तदाब असणाºया व्यक्तींनी अंगावर दुखणे न काढता त्वरित जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावेत. स्वाईन फ्ल्यूूची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशन केंद्राद्वारे तापसदृश्य रुग्णांची यादी तयार केली जात आहे.

गर्दीत जाऊ नका
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका सार्वजनिक ठिकाणी थुंकणे स्वाईन फ्ल्यू संसर्गजन्य असल्याने शक्यतो गर्दीत जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

रुग्णांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. प्रामुख्याने स्वाईन फ्ल्यू, चिकुनगुणिया, डेंगी या आजारांवर नियत्रंण ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात जनजागृती केली जात आहे. तसेच तातडीने प्राथमिक उपचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वाईन फ्ल्यू आजाराबद्दल जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशन केंद्र उभारले आहेत. त्याद्वारे रुग्णांची वेगळी यादी तयार करुन उपचार केले जाणार आहेत.
- प्रवीण माने, बांधकाम व आरोग्य समिती, सभापती

Web Title: Swine Flu Counseling Center, Zilla Parishad's decision in health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे