शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर्सवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 04:03 IST

शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव तसेच वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्यात येणार आहेत.

पुणे : शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव तसेच वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्यात येणार आहेत.पुढील उन्हाळा संपेपर्यंत त्यांच्यावरची बंदी कायम असेल. खडकवासला धरणातून जलसंपदा महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी देणार असल्याचे नक्की झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाणी कमी पडू नये यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरात महापालिकेच्या मालकीचे पोहण्याचे तलाव आहेत. त्यांना महापालिकेचे पाणी द्यावे लागते. त्याशिवाय वाहने धुण्याची बरीच केंद्रेही आहेत. त्यांनाही महापालिकेचे पाणी दिले जाते. काही लाख लिटर्स पाणी यात जाते. ते वाचावे यासाठी तलाव व वॉशिंग सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले.शहरात ज्या भागात पाणी मिळत नाही तिथे महापालिकेकडून टँकरने पाणी दिले जाते. उपनगरांसाठी महापालिकेचे साधारण ३०० टँकर्स एरवीही सुरू असतात. त्यात आता वाढ झाली आहे. सध्या ४०० पेक्षा जास्त टँकर वापरले जात असून त्यातून काही भागांना पाणी दिले जात आहे. महापालिकेकडून विनामूल्य टँकर मिळत असल्याने नगरसेवकांनी महापालिकेकडून टँकर मिळवून द्यावेत यासाठी त्यांच्यावर नागरिकांचा दबाव वाढत आहे.सध्या महापालिका १ हजार ३०० एमएलडी पाणी रोज घेत आहे. तरीही ते कमी पडत आहे व त्यामुळे नियोजन करण्याची वेळ आली आहे. त्याची नागरिकांनी सवय व्हावी यासाठीच पाणी एक वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर धरणातून फक्त १ हजार १५० एमएलडीच पाणी देणार असे जलसंपदाने महापालिकेला लेखी कळवले आहे. तसेच त्यापेक्षा जास्त पाणी उचलल्याचे लक्षात आले तर यापूर्वी केली तशीच पंप बंद करण्याची कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली आहे. दिवाळीनंतर पाणी आणखीनच कमी होणार असल्याने आता वेगवेगळ्या उपायांद्वारे पाणी वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोहण्याचे तलाव व वॉशिंग सेंटर्स बंद करण्याबरोबरच शहरातील पाण्याचे जुने स्रोतही शोधण्यात येणार असल्याची माहिती गेडाम यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे