शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:45 IST

पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी, २२ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कवी संमेलनात या पुरस्कारांचे वितरण रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशनिवारी होणार वितरण : सुरेश शिंदे, सुदेश लोटलीकर यांची निवड

पुणे : जामखेडमधील स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानतर्फे २०१७ सालचा श्री संत नामदेव पुरस्कार करमाळा येथील कवी डॉ. सुरेश शिंदे, तर २०१८ सालचा पुरस्कार फोंडा, गोवा येथील कवी सुदेश लोटलीकर यांना जाहीर झाला आहे. पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी, २२ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कवी संमेलनात या पुरस्कारांचे वितरण रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते आणि पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यापूर्वी हा पुरस्कार प्रा. पुरूषोत्तम पाटील (धुळे), भाऊसाहेब पाटणकर (यवतमाळ), वामन कर्डक (नाशिक), राजा मुकुंद (कंधार), प्रा. वसंत सावंत (सावंतवाडी), रा.ना. पवार (सोलापूर), शाहीर साबळे (मुंबई), फादर फ्रान्सिस दिब्रेटो (वसई), शाहीर विभुते (सांगली), पद्मश्री  ना.धों, महानोर (पळसखेडे), लोकशाहीर विठ्ठल उमप (मुंबई), प्रा. रा.ग. जाधव (वाई), शाहीर शेख जैनुद्दीन चाँद (मुंबई), डॉ. अशोक कामत (पुणे), डॉ.निर्मलकुमार फडकुले (सोलापूर), डॉ. वि.मा. बाचल (पुणे), सत्यपाल वि. सिरसोलीकर (अकोट), शाहीर लीलाधर हेगडे (मुंबई), प्रा. विठ्ठल वाघ (अकोला), प्रा. फ.मुं. शिंदे (औरंगाबाद), अशोक नायगांवकर (मुंबई), अरूण म्हात्रे (मुंबई), संभाजी भगत (मुंबई), आमदार विष्णू सुर्या वाघ (गोवा) या महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे मानकरी कवी डॉ. सुरेश शिंदे हे निवृत्त प्राचार्य असून काटेवन आणि पुस्तकात नसलेली पाने हे दोन काव्यसंग्रह आणि संताचा विद्रोह हा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध आहे. कवी सुदेश लोटलीकर यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित झाले असून विविध साहित्य पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान जामखेडचे प्रमुख आणि ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेramdas phutaneरामदास फुटाणे