शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट हबचे काम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:28 IST

पीएमपीएल या तिन्ही प्रवासी सेवांचा अत्युत्कृष्ट समन्वय या बहुमजली हबमधून प्रत्यक्षात येणार आहे.

पुणे : महामेट्रोच्या स्वारगेट चौकातील बहुमजली ट्रान्स्पोर्ट हबचे काम येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. सुमारे २० एकर जागेत हे स्थानक होणार असून, त्यातून एसटी, मेट्रो व पीएमपीएल यांचे एकात्मिक व्यवस्थापन साकार होणार आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. शहरातील प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो, एसटी तसेच पीएमपीएल या तिन्ही प्रवासी सेवांचा अत्युत्कृष्ट समन्वय या बहुमजली हबमधून प्रत्यक्षात येणार आहे. त्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्यासाठीच्या निविदांची मुदतही संपली आहे. येत्या काही दिवसांमध्येच या महत्त्वाकांक्षी हबचे काम सुरू होईल, अशी खात्री दीक्षित यांनी व्यक्त केली.जागेसाठी महापालिका, एसटी महामंडळ तसेच पीएमपी यांनी सहकार्य केले आहे. एकूण २० एकर जागेत हे बहुमजली स्थानक असेल. त्यात कॅब कंपन्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था या हबमध्ये असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्यात देण्यात येतील. याच स्थानकात मेट्रोच्या कात्रज तसेच खडकवासला या विस्तारीत मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. स्वारगेटच्या देशभक्त केशवराव जेधे चौकातील बीआरटीला या रचनेमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.हे काम मोठे आहे. स्वारगेट चौकातून दररोज लाखापेक्षा जास्त पायी चालणारेच असतात. त्याशिवाय एसटी, पीएमपीएल, रिक्षा, खासगी वाहने यांचीही संख्या बरीच आहे. या सर्वांना या कामाचा कमीतकमी त्रास होईल याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पर्यायी मार्ग निश्चित करण्यात येत आहे. पादचारी सुरक्षित राहतील व वाहतूकही सुरळीत राहील, याच पद्धतीने हबचे काम होईल, असे दीक्षित म्हणाले.प्रस्ताव महामेट्रोकडे पाठवावादरम्यान, मेट्रो मार्गाच्या दुतर्फा २० मीटर अंतराच्या आतमध्ये कोणतेही नवे बांधकाम करण्यास अथवा आहे त्या बांधकामामध्ये दुरुस्ती करण्यास आता महामेट्रोचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. मेट्रो कायद्यातच तशी तरतूद असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली.मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, विशेषत: भुयारी मार्गाचे काम सुरू असताना त्याला किंवा जे बांधकाम होणार आहे त्याला कसलाही धोका होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत असते. ज्यांना बांधकाम करायचे आहे, त्यांनी महापालिकेकडे त्यासाठी परवानगी मागावी, महापालिकेने त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर त्याचा प्रस्ताव महामेट्रोकडे पाठवावा, महामेट्रोचे तज्ज्ञ त्याची तपासणी करतील, आवश्यकता असल्यास त्यात सुधारणाही सुचवतील किंवा स्थगितीही देतील, असे दीक्षित यांनी सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रो