शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संगीताच्या सुरातून ईश्वरी प्रसाद : निर्मला गोगटे; स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे कलाकारांचा पुण्यात गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:00 IST

स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने संगीतक्षेत्रातील कलाकारांना ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.

ठळक मुद्देसंगीताचा सूर ज्याला गवसला त्याला ईश्वरी प्रसाद मिळाला : निर्मला गोगटेस्टेजवर वादन करताना आपल्याला नवनवीन शिकायला मिळते : - प्रसाद गोंदकर 

पुणे : पुण्याचा लौकिक सांस्कृतिक राजधानी, रसिक जाणकारांचे शहर आहे. शहरात वर्षभर विविध कलामहोत्सव सुरू असतात. संगीत प्रांत असा आहे, हे महान संगीत जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा आपण खुशीत असतो; परंतु जेव्हा त्याची आपल्याला महानता कळते तेव्हा मन इतके अंतर्मुख होते. या संगीताचा सूर ज्याला गवसला त्याला ईश्वरी प्रसाद मिळाला, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांनी भावना व्यक्त केल्या.स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने संगीतक्षेत्रातील कलाकारांना ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे, गिरीश जोशी उपस्थित होते. संगीतकार चिनार-महेश यांना केशवराव भोळे पुरस्कार, गायिका सुमेधा देसाई यांना माणिक वर्मा पुरस्कार, प्रियंका बर्वे-कुलकर्णी यांना डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार, सतारवादक प्रसाद गोंदकर यांना विजया गदगकर पुरस्कार देऊन गौरविले, कार्यक्रमांमध्ये ध्वनी व्यवस्थेच्या जबाबदारीबद्दल खाडे साऊंडचे प्रदीप व प्रकाश खाडे यांचा विशेष सत्कार केला. गोगटे म्हणाल्या, ‘‘सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था एक प्रकारे कलेचीच पूजा बांधत असतात. अशा संस्थांचे कलेतील व कलाकारांच्या आयुष्यातील स्थान खूप मोठे आहे; परंतु संगीत शिकण्यासाठी प्रत्येक क्षण शिष्य बनून राहावे लागते. कलाकारांनी कलेची साधना करताना, काहीही अपेक्षा न ठेवता सातत्याने आपली कला जतन करावी. तर, अंतर्मुख होऊन सातत्याने अलिप्त होऊन आपले गाणे, वादन आपण एकणे खूप महत्त्वाचे आहे.’’ 

मी गेली १८ वर्षे या रंगामंचाशी निगडित आहे. स्टेजवर वादन करताना आपल्याला नवनवीन शिकायला मिळते. संगीताचे बाळकडू हे मला माझ्या आईकडून मिळाले आहे. तर, माझ्या वादनावर संस्कार माझ्या आई-वडिलांनी केले आहे. - प्रसाद गोंदकर 

कलाकारासाठी पाठीवर कौतुकाची थाप मिळणे फार मोठा गौरव असतो. ही थाप मला या पुरस्काराद्वारे मिळाली आहे.      - प्रियंका बर्वे-कुलकर्णी  

टॅग्स :Puneपुणे