शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांमध्ये स्वॅब कलेक्शन सुरू करणार : महापौर मुरलीधर मोहोळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 20:42 IST

आगामी काळामध्ये कोरोना रूग्ण मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजनबध्द काम व त्यादृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता

ठळक मुद्देकोरोना रूग्ण आणि संशयित रूग्णांचा वैद्यकीय इतिहास सादर करणे बंधनकारक

पुणे : शहरात स्वॅब कलेक्शन सेंटरची कमतरता भासत असल्याने, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयासाठी स्वतंत्र स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच आत्तापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या कारणांचा सविस्तर अहवाल मागविण्यात येणार असून, या कारणांचा अभ्यास करून मृत्यूदर कमी करण्यासाठी उपचार व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.     पुणे शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी महापौर मोहोळ यांच्या उपस्थितीत, राज्य शासनाचे समन्वय अधिकारी, पुणे मनपाचे अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. 

    यावेळी महापौर मोहोळ यांनी, आगामी काळामध्ये मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजनबध्द काम व त्यादृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याकरिता  खाजगी डॉक्टर्स व आयसीएमआर मान्यताप्राप्त लॅब व्यवस्थापनाकडून कोरोना रूग्ण आणि संशयित रूग्णांचा वैद्यकीय इतिहास सादर करणे यापुढे बंधनकारक करणार असून, त्यासाठी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात येणार आहे़ त्यामुळे अशा रूग्णांवर वेळ वाया न जाता तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. याचबरोबर शहरात अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढविण्यात येणार असून, प्रत्येक परिमंडळास ३ अ‍ॅम्ब्युलन्स अशा १५ अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.      पोलीस यंत्रणेबरोबर चर्चा करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र नव्याने निर्माण करण्यात यावे़ व या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी करण्यात याव्यात. यासाठी मनपा प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात यावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून त्यांना तातडीने उपचार मिळावेत अशा सूचनाही मोहोळ यांनी यावेळी प्रशासनास दिल्या. याकरिता प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय एक स्वतंत्र समन्वयक नेमून आयसीयू बेडस्, ऑक्सिजन बेडस् यांची उपलब्धता स्मार्ट सिटी प्रणाली व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विनाविलंब माहिती घेऊन रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे. याचबरोबर आयसीयू बेड मिळाले नाही म्हणून रूग्णांची परवड होणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटल