पुणे : आरक्षित जमिनीवर मंगल कार्यालयाचे बांधकाम केल्यामुळे धानोरी येथील रेखा टिंगरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या निर्णयाला लघुवाद न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. न्यायालयाचा पुढील निर्णय होईपर्यंत टिंगरे यांना पदाचा वापर करणे शक्य होणार आहे. टिंगरे यांनी आरक्षित जागेवर मंगल कार्यालयाचे बांधकाम केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, असा अर्ज स्थानिक कार्यकर्ते दिलीप ओरपे यांनी ३ वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात केला. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांनी निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.दोन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी टिंगरे यांचे नगरसेवकपद रद्द केले. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी पिटीशन टिंगरे यांनी २१ सप्टेंबरला उच्च न्यायालयात केली होती.
रेखा टिंगरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यास स्थगिती
By admin | Updated: October 6, 2016 04:06 IST