फुरसुंगी : पुणे महापलिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी जमीनधारकांच्या वारसांचा नोकरीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी असून पालिकेत तीन महिन्यात नोकऱ्या मिळतील, असे लेखी पत्र दिल्याने शुक्रवारी ग्रामस्थांनी सुरू केलेले कचरा डेपो बंदचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित केले आहे. मात्र, प्रशासनाने आपला शब्द पाळला नाही तर तीन महिन्यांनंतर डेपोवर कचऱ्याच्या गाड्या नव्हे, तर एकही अधिकारी फिरकू देणार नाही टाळे ठोकू, असा इशारा दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.फुरसुंगी आणि उरुळीदेवाची ग्रामस्थांनी आज सकाळी येथील आंदोलन सुरू केले. कचऱ्याच्या गाड्या परत पाठविल्या. त्यानंतर कुणाल कुमार यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. चर्चा करून लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. कचऱ्यासाठी मध्यम व दीर्घकालीन करावयाची घनकचरा जनजागृती, नागरिकांचा सहभाग, कचरा विलगीकरण, संकलन, प्राथमिक व दुय्यम वाहतूक, प्रक्रिया, शास्त्रीय भूभराव याबाबत उपाययोजनेचे आश्वासन दिले. भविष्यात निर्माण (दहा वर्षे) होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन यासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीचे आरक्षण, भूसंपादन व या सर्व बाबीसाठी करावी लागणारी अंदाजपत्रकीय आर्थिक तरतूद करण्याचेही सांगितले.
कचरा डेपोविरोधातील आंदोलन स्थगित
By admin | Updated: June 10, 2017 02:22 IST