पुणे : महाराष्ट्राची सुशिकला आगाशे व केरळच्या अॅलिना रेजेने महिलांच्या ज्युनिअर टीम स्प्रिंट प्रकारात ३६.६४३ सेकंदाची वेळ नोंदवून एशियन सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय सायकलिंग महासंघाच्या वतीने नवी दिल्लीत यमुना वेलोट्रममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मूळच्या निलज गाव (जिल्हा भंडारा) येथील जिल्हा परिषदेच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या सुशिकलाने आणि अॅलिनाने प्रत्येकी २५० मीटरच्या या सायकल शर्यतीत कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. या प्रकारात चीनच्या संघाने ३५.८०७, तर तैपेईच्या मुलींनी ३६.६२३ सेकंदाची वेळ नोंदवून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. या प्रकारात प्रत्येक संघातील २ सायकलपटूंनी २५०-२५० मीटर अंतर पूर्ण करायचे असते. दुसरीकडे सुशिकला भंडारा येथे असताना अ. वा. बुद्धे तर पुण्यात असताना दिपाली निकम-पाटील यांच्याकडे सराव करते. महिलांच्या ४ किलोमीटर टीम परस्युट प्रकारात मनोरमा, आबेदेवी, ऋतुजा व अम्रिता पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुशिकलामधील गुण हेरून तिला तुडका देव्हाडी येथे आठ महिने प्रशिक्षण दिले. त्यानंतर तिची क्रीडा प्रबोधिनी पुणे त्यानंतर साई येथे निवड झाली. असे विद्यार्थी शोधून प्रशिक्षण देण्याचे काम निरंतर सुरू असून माझ्या विद्यार्थ्याने आॅलिम्पिक स्पर्धेत पोहोचून तिरंगा फडकवावा, अशी आपली ईच्छा आहे.- अ. वा. बुद्धे, प्रशिक्षक, भंडारा.आम्ही क्वॉलिफिकेशनच्या दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकलो असतो, पण आमच्याकडून ही संधी हुकली. थोड्याच अंतराने आमचे रौप्यपदक हुकले. आज झालेल्या आमच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. पुढे आम्हाला अजुन चांगला सराव करून पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.- सुशिकला आगाशे
महाराष्ट्राच्या सुशिकलाला कांस्यपदक
By admin | Updated: February 7, 2017 02:30 IST