शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्त्व विभागाकडून जेजुरीगडाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 00:16 IST

सूचना पाठवल्या : उपाययोजनांची प्रतीक्षा

जेजुरी : जेजुरीगडाची पुरातत्त्व विभागाकडून मंगळवारी पाहणी करण्यात आली असून पाहणीनंतर मार्तंड देव संस्थानला सूचना देण्यात आल्या आहेत. जेजुरीचे कुलदैवत खंडेरायाच्या गडकोट, मंदिर आवार व पायरीमार्गावरील दीपमाळा, वेशी यांच्या डागडुजी-दुरुस्तीची गरज या आशयाचे वृत्त दै. ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेऊन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, वास्तूजतन सहायक रामेश्वर निपाणे यांनी जेजुरी येथे येऊन पायरीमार्ग, मंदिर, गडकोट आवार, दीपमाळा, वेशी, तटबंदी यांची पाहणी केली होती. त्यानंतर एका पत्राद्वारे देवसंस्थान समितीला सुमारे ११ सूचना करण्यात आल्या आहेत. खंडोबा गडकोट मंदिर राज्यसंरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्तीबाबत वास्तुविशारदतज्ज्ञ नेमण्यात येऊन अहवाल /आराखडा, संरचनात्मक परीक्षण अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्याचा खर्च देवसंस्थानने करावयाचा आहे.वास्तूचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला मार्बल लावण्यात आल्याने आतील भागात आर्द्रता वाढत आहे. त्यामुळे मूर्ती व मंदिराचे आयुष्यमान कमी होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या तटबंदीतील ओवरी अनेक वर्षांपासून बंद करून कार्यालय, स्नानगृह, स्वयंपाकगृह खोल्या, निर्माण केल्याने व यात वापरणारे पाणी भिंतीत मुरल्याने भिंत फुगलेली आहे. काही दगड कोसळण्याची शक्यता आहे. पायरीमार्ग व गडकोटाच्या बाजूला अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून दीपमाळा, वेशींना ताडपत्र्यांच्या प्लॅस्टिक कागदांच्या दोºया बांधल्या आहेत. त्यामुळे हवा व पाणी यांच्या दबावाने दीपमाळा, वेशी, पुरातन वास्तूंना धोका निर्माण होत आहे. ते तत्काळ काढण्यात यावेत.मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. तो वेळच्यावेळी स्वच्छ करावा. धोकादायक ठिकाणी सूचनाफलक लावण्यासह आदींसह सुमारे ११ सूचना करण्यात आल्या आहेत.

मंदिर, गडकोट, दीपमाळा, पायरीमार्ग, नगारखाना, प्रवेशद्वार, विविध मंदिरे, कमानी, दगडी शिल्पे यांची पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार जतन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. बृहद्आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. विकासकामांचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात येईल.

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणे