शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आश्चर्याची गोष्ट... व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे वाहन चोरीची फिर्याद मागे घेतली थेट जर्मनीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:35 IST

दैनंदिन जीवनात सध्या व्हॉटसअ‍ॅप हे अविभाज्य भाग होत चालले आहे. त्याचाच प्रत्यय आता न्यायालयीन कामकाजात देखील येऊ लागला आहे... तर मग झाले असे की...

ठळक मुद्देलोकअदालतीतील उपक्रम : न्यायव्यवस्थाही टेक्नोसॅव्हीव्हॉट्अअ‍ॅपद्वारे पाठवलेली नोटीस गेल्या महिन्यात न्यायालयाने ग्राह्य

पुणे : पीडीएफ स्वरुपातील नोटीस, स्काईपद्वारे घटस्फोट अशा तांत्रिक माध्यमातून न्यायालयीन कामकाज होत असल्याचे सध्या दिसते. परंतु, त्यापुढे जात शुक्रवारी झालेल्या लोकन्यायालयात  आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर्मनीमध्ये राहत असलेल्या एका तक्रारदाराची व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे वाहन चोरीची फिर्याद मागे घेण्यात आली आहे.     दैनंदिन जीवनात सध्या व्हॉटसअ‍ॅप हे अविभाज्य भाग होत चालले आहे. त्यामुळे आता न्यायालयीन कामकाज देखील या माध्यमातून होत असल्याचे दिसते. न्यायमूर्ती गजानन नंदनवार, सहायक सरकारी वकील अ‍ॅड. वामन कोळी, अ‍ॅड. सोनाली माने आणि अ‍ॅड. मयुरेश घोलप यांच्या पॅनलने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. ९ सप्टेंबर २००७ रोजी दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी अतूल दत्तात्रय राळेभात (वय २६, रा. श्रीनिवास अपार्टमेंट, घोरपडी पेठ) यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतूल यांचे वडील प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत.    तक्रार मागे घेवून हे प्रकरण मिटविण्याची इच्छा अतूल यांना यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे हा खटला निकाली काढण्यासाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, फिर्याद मागे घेण्यासाठी तक्रारदाराने परवानगी देणे आवश्यक असते. पण अतुल हे जर्मनीत असल्यामुळे त्यांना हजर राहून तक्रार मागे घेण्याबाबत अर्ज करता आला नाही. त्यामुळे पॅनलमधील अ‍ॅड. सोनाली माने यांच्या व्हॉटसअ‍ॅपवरून अतुल यांना फोन करण्यात आला. त्यांनी फोनवर तक्रार मागे घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हे प्रकरण रद्द करण्यात आले.    बँकेत प्रलंबित असलेल्या प्रकरणात ग्राहकाने नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने त्याला थेट व्हॉट्अअ‍ॅपद्वारे पाठवलेली नोटीस गेल्या महिन्यात न्यायालयाने ग्राह्य धरली होती. तर पती किंवा पत्नी परदेशात असताना त्यांनी  स्काईपद्वारे घटस्फोट घेतल्याचे अनेक प्रकार कौटुंबिक न्यायालयात घडले आहे. त्यात आता व्हॉटसअ‍ॅप कॉलद्वारे तक्रार मागे घेण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. 

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअॅपCourtन्यायालयGermanyजर्मनी