शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वधूपित्याने दिलेल्या ‘अनोख्या ’ भेटीने वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 20:56 IST

लग्नसमारंभात दुचाकी, आलिशान मोटारी, सोन्याचे दागिने मुलीला आणि जावयांना भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, आपल्याला असणारी आवड जोपासली जावी यासाठी वधूच्या पित्याने ही अनोखी भेट दिली आहे.  

ठळक मुद्देलग्नसमारंभात चार बैल, एक घोडी, बैलगाडा भेट 

तळेगाव दाभाडे : आजपर्यंत लग्न समारंभात भांडी, दुचाकी-चारचाकी गाडीसह संसारोपयोगी वस्तू दिल्या गेल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. तसेच झालीच्या विधीमध्ये मातीचा रंगवलेल्या बैलांचा जोडही अनेकदा लक्ष वेधून घेतो. मात्र, एका वधूपित्याने नवरी मुलीला चक्क खरोखरचे चार बैल, एक घोडी आणि बैलगाडा आंदण म्हणून भेट दिले आहे. लाडक्या मुलीला ही अनोखी दिलेली भेट पाहून वऱ्हाडी मंडळी थक्क झाली. ही अनोखी भेट पाहण्यासाठी केवळ वऱ्हाडी मंडळीच नाही तर तळेगाव -चाकण रस्त्याने ये-जा करणारे प्रवासी देखील येथे थांबत होते. खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील शेतकरी व बैलगाडा मालक उत्तम पडवळ यांची कन्या गौरी हिचा मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील माजी उपसरपंच व बैलगाडा मालक मोहन काळडोके यांचा मुलगा नामदेव यांच्याशी देहूफटा येथील एका कार्यालयात विवाह झाला. यावेळी नववधूच्या पित्याने आंदण म्हणून चार बैलांचा जुंपता गाडा दिला. याशिवाय घाटात बैलगाड्यापुढे धावणारी एक देखणी घोडीही दिली. अनेकांनी आपल्या मुलामुलींच्या लग्नसमारंभात दुचाकी, आलिशान मोटारी, सोन्याचे दागिने मुलीला आणि जावयांना भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, आपल्याला असणारी आवड जोपासली जावी यासाठी वधूच्या पित्याने ही अनोखी भेट दिली आहे.  खेड आणि मावळ तालुक्यात एमआयडीसीमुळे जमिनींना भाव आला आहे. यामुळे लग्नसमारंभही मोठ्या थाटामाटात पार पडत आहेत. त्यासाठी जमीनविक्रीतून आलेला पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. मात्र, या वधूपित्याने मुलीला दिलेल्या भेटीतून पशुधनाचे महत्त्व पटवून दिले आहे. यापूर्वी वधूपित्याने आलिशान मोटारी दुचाकी भेट दिल्या आहेत. काही जणांनी तर जावयांना मानासाठी १०१ गाड्या भेट दिल्या आहेत. त्यामुळे सध्या लग्नसमारंभात कोणती वस्तू भेट दिली जाते याबाबत वऱ्हाडींमध्ये उत्सुकता असते. मात्र, ही अनोखी भेट पाहून उपस्थितांना सुखद धक्काच बसला.      

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसmarriageलग्न