शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सुप्रिया सुळेंची संपत्ती २८ कोटींनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 23:56 IST

परदेशातील बँकेतही काही कोटींच्या ठेवी : पुण्यासह मुंबईमध्ये सदनिका

पुणे : लोकसभा निवडणूकीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात २८ कोटी ९७ लाखांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये दाखल प्रतिज्ञापत्रात सुळे कुटुंबियांची संपत्ती ११३ कोटी रुपये होती.आता १४२.८७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

आयकर विवरण पत्रात २०१६-१७ मध्ये त्यांनी २ कोटी ४० लाख २८ हजार २६३ रुपयांचे उत्पन्न दाखवले होते. २०१७-१८ मध्ये त्यांनी १ कोटी २९ लाख १९ हजार ७३४ उत्पन्न दाखविल्याचे दिसून येत आहे. १११ कोटी रुपये जंगम आणि २२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. या संपत्तीमध्ये पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे यांचा समावेश आहे. पती सदानंद सुळे यांच्या नावे विदेशी बँकेत ४ कोटी ३५ लाख २९ हजार ६४४ रुपये आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नावे विदेशी ठेवी व गुंतवणुकीची रक्कम २ कोटी १४ लाख २८ हजार १९९ रुपये आहे. शेती व व्यवसायातून ही संपत्ती मिळवल्याचे व आपल्या कुटुंबाकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न २०१३-१४ मध्ये १ कोटी १४ लाख २५ हजार एवढे असल्याचे आयकर विवरणपत्रात देण्यात आले आहे. त्यात २०१७-१८ मध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मुलगी रेवती हिच्या नावे बंदपत्रे व शेअर्स ६ कोटी ३२ लाख ४३,७१६ रुपये एवढ्या रकमेचे आहे तर मुलगा विजय याच्या नावे ३ कोटी ११ लाख ९८ हजार १६८ रुपयांची बंदपत्रे व शेअर्स असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

सुप्रिया सुळेशिक्षण................ बी.एस्सीवय.................... ४९दाखल गुन्हे........... एकही नाही४ किलो सोन, ४० किलो चांदी,सव्वा तीन कोटींचे हिरेसुळे कुटुंबाकडे ३.९७२ किलो सोने, ४०.४५० किलो चांदी, १२४७ कॅरेटचे ३,१५,३८,६३५ रुपयांचे हिरे आहेत. सुप्रिया सुळेंकडील दागिन्यांची किंमत १ कोटी ६९ लाख रुपये आहे.

वाहन मात्र एकही नाही४सुप्रिया सुळे यांच्या हातात केवळ २८ हजार ७७० रुपये,तर पती सदानंद सुळे यांच्याक डे २३ हजार रुपये रोख रक्कम आहे.तसेच मुलगी रेवती हिच्याकडे २८ हजार ९०० रुपये आणि मुलागा विजयकडे १३ हजार ६०० रुपये रोख रक्कम आहे.तसेच स्वत:कडे एकही वाहन नसल्याचे म्हटले आहे.शेतजमीनीची किंमत २ कोटी ७० लाख४ सुप्रिया सुळे यांच्याकडे बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ५ हेक्टरहून अधिक जमीन असून ढेकळेवाडीत ३० गुंठे जमीन आहे.या जमीनीची सध्याचे बाजारमुल्य २ कोटी,७० लाख ८२ हजार ५२० रुपये आहे.४सुळे यांच्याकडे मुंबईत जीबी देशमुख मार्ग येथे रामालयममध्ये फ्लॅट आहे. तसेच पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये एस सिल्व्हर वुड्समध्ये फ्लॅट आहे.तर पती सदानंद सुळे यांच्या नावे शिवाजीनगरमध्ये मोदी बागेत फ्लॅट आहे.४सुप्रिया सुळे यांनी स्वसंपादित १ कोटी ७३ लाख ५८ हजार ५७८ रुपयांचे तर पती सदानंद सुळे यांनी ४ कोटी १५ लाख ६ हजार ३२८ रुपयांची संपत्ती मिळवली आहे.मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर असून त्यांनी मुंबईतील जयहिंद कॉलेजमधून बी.एस्सी पदवी प्राप्त केले आहे. सुप्रिया सुळे
मालमत्ता सुप्रिया सुळे सदानंद सुळे (पती) अवलंबित्व१जंगम २१,२६,९६,९५५ ८३,९६,२४,५२७ ८,९२,०८,१४५स्थावर १८,४०,३९,२९८ ४,१५,०६,३२८ नाहीकर्ज ५५,००,००० नाही नाही

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणे