शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सुप्रिया सुळे लागल्या कामाला : विधानसभेसाठी बोलावली बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 15:45 IST

खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तयारीला लागल्या असून त्यांनी पुण्यात आल्यावर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांची ही कृती बघता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आत्ताच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

पुणे : खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तयारीला लागल्या असून त्यांनी पुण्यात आल्यावर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांची ही कृती बघता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आत्ताच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात पाच खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगमी  विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याचाच प्रत्यय पुण्यात दिसला असून नवनिर्वाचित खासदार झालेल्या सुळे यांनी शहरात पाऊल ठेवताक्षणीच ग्रामीण आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला त्यांच्या मतदारसंघातील सर्व पदाधिकाररी उपस्थित असून स्वारगेट येथील निसर्ग मंगल कार्यालयाजवळील त्यांच्या कार्यालयात ही बैठक झाल्याचे समजते. राष्ट्रवादीला लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेसइतकी त्यांची दाणून हार झालेली नाही. त्यामुळे हाच धागा पकडत मताधिक्य बघून त्यांनी विधानसभा मतदारसंघ टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेली मते आणि स्थानिक सक्षम उमेदवार असे गणित जुळवून लगेच तयारी सुरु केली तर त्यांना चांगला प्रतिसादही मिळू शकतो. हेच सव मुद्दे लक्षात घेत सुळे यांनी बैठक बोलावल्याचे समजते.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्येही निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठीही पक्षाला उमेदवार उभे करायचे आहेत. त्याचीही चर्चा या बैठकीत होणार आहे. शिवाय विधानसभेचीही चर्चा होणार असून उमेवारांच्या नावाची प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

इंदापूरचे काय होणार ?

अजित पवार यांची विनंती विचारात घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे असल्यामुळे आता पाटील यांच्या मदतीची परतफेड सुळे करणार का असा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चेत इंदापूरविषयी उत्सुकता आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक