शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रद्दी संकलनातून मिळतोय गरजूंना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:55 IST

बीइंग वॉलिंटियर संस्थेचा पुढाकार : २५०० स्वयंसेवकाच्या मदतीने काम सुरू

अतुल चिंचली 

पुणे : शिका आणि मोठे व्हा, शिक्षण घ्या प्रगती करा, अशा वाक्यांचा खरा अर्थ आपल्याला शिक्षण घेतानाच समजू लागतो. समाजात अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांसोबत शिक्षण ही महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक मुलाने शिकायला पाहिजे. अशाच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रद्दी संकलन केलेल्या पैशातून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बीइंग वॉलिंटियर संस्थेने पुढाकार घेतला आहे.

ही संस्था २०१४ पासून या कामात कार्यरत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून २५०० स्वयंसेवकाच्या मदतीने काम करते. महाराष्ट्रात पानशेत, मुळशी, हिंजवडी, कर्जत अशा भागांतील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपण, अनेक निरनिराळे उपक्रम व कार्यशाळा अशा गोष्टी संस्थेच्या माध्यमातून केल्या जातात. रद्दी संकलन करण्यासाठी संस्थेने पुणे शहरातील अनेक सोसायट्या व कंपन्याची मदत घेतली आहे. पिंपळे गुरव, औंध, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, आनंदनगर या भागांतील या सोसायटीकडून रद्दी संकलन केले आहे. त्यामध्ये डॅफोडिल्स सोसायटी पिंपळे गुरव, हर्ष पॅराडाईज औंध, वात्सल्य विहार औंध, सारा सोसायटी बाणेर, क्रीमसन बाणेर, टकराऊ सोसायटी, तर टीसीएस, एनविडिया, सिमेंटेक या कंपन्यांकडून रद्दी घेतली जाते. दर महिन्याला २००० किलो रद्दी गोळा होते. ही रद्दी पुन्हा रिसायकलिंग करण्यासाठी मोठ्या एजन्सीला दिली जाते. मागील वर्षी संस्थेने वर्षभरात २०८०० किलो रद्दी गोळा केली. यातून संस्थेला १७१२५४ एवढे पैसे मिळाले. या पैशाचा वापर पानशेत भागातील रचना हॉस्टेलमध्ये शिकत असणाऱ्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात आला. सोसायटीमध्ये रद्दी गोळा केली की, त्या मुलांसाठी कागदापासून पेपर बॅग, डस्टबिन बॅग, अशा वस्तू कशा प्रकारे बनवल्या जातात, याची कार्यशाळा घेतली जाते.रद्दी संकलन या उपक्रमाला आम्ही २०१५ साली सुरुवात केली. शिक्षण ही एक गरज असल्याने ती पूर्ण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. समाजात सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक भागांत आदिवासी लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. पण काही आर्थिक अडचणींमुळे ते शैक्षणिक खर्च उचलू शकत नाही. आमची संस्था अशाच गरजू विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेऊन त्यांना आधार देते.- कैलास नरावडे, अध्यक्ष, बीइंग वॉलिंटियर संस्था

टॅग्स :Puneपुणे