शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर परिसरात सूर्यफुल शेती बहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:24 IST

खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्त पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतक-याने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक्ष वेधून घेत आहे.

 वालचंदनगर : खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्तपिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतकºयाने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक्ष वेधून घेत आहे.वालचंदनगर, रणगांव, शिरसटवाडी या परिसरातील अनेक शेतकरी अनेक वर्षानंतर सूर्यफुल या नगदी पिके घेण्याकडे वळलाआहे. तब्बल ३० वर्षांनंतर सूर्यफुल मोठ्या डौलदारपणे डवलत असल्याने अनेकांची मने जिंकून घेतले जात आहे. सर्वत्र पिवळेधमक रान दिसत असल्याने अनेक तरूण आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी सरसावलेले दिसत आहेत. खरिपाच्या पेरणीत पहिल्यांदाच सूर्यफुलाची पेरणी करण्यात आलेली आहे. बाजारातील खाण्याच्या तेलाचे वरचेवर वाढत चाललेले भाव परवडत नसल्यामुळे शेतकरी घरच्या घरीच तेलाचे उपाय शोधून काढत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून तालुक्यातून हद्दपार झालेल्या तूर उत्पादनाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होताना दिसत आहे. शेकडो एकरात तुरीची पेरणी करून हजारो टन तुरीचे उत्पादन इंदापूर तालुक्यात घेण्यातआलेले आहे. खरीपाच्या हंगामात पेरण्यात येणारे तुर, बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन, सूर्यफुल या पिकाचे उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.गेल्यावर्षी या भागातील शेतकºयाने तुरीचे भरमसाठ उत्पादन घेतले परंतु योग्य बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकºयांत नाराजी पसरलेले होते. परंतु, ५ हजार भाव पहिल्यांदाच मिळाल्याने व डाळीचे कायमचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकरी समाधानी होते.याही वर्षी तूर, उडीद, मूग, सोयाबीन त्यात भर म्हणून सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे