शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

उन्हाळ्यात तरणतलाव बंदच

By admin | Updated: March 22, 2017 03:19 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर जानेवारी २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीगाव आणि संभाजीनगर येथील जलतरण तलावांचा

पिंपरी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर जानेवारी २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीगाव आणि संभाजीनगर येथील जलतरण तलावांचा उद्घाटन समारंभ उरकण्याची घाई केली. निवडणूक होऊन गेली, तरी अद्याप हे दोन्ही जलतरण तलाव सुरू होऊ शकले नाहीत. उन्हाळयात पाण्याची टंचाई जाणवू लागताच, पाणीकपातीचे धोरण अवलंबले जाते. त्याचाच एक भाग म्हणून उन्हाळ्यात आहे ते तलाव बंद ठेवले जातात. अशा परिस्थितीत नव्याने साकारलेले जलतरण तलाव उन्हाळ्यात खुले होतील, ही नागरिकांची आशा मावळली आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलावाचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण केले आहे. हा तलाव नूतनीकरणानंतरही अधूनमधून बंद ठेवला जातो. यमुनानगर आणि प्राधिकरण येथील जलतरण तलाव वारंवार विविध कारणास्तव बंद ठेवले जातात. कासारवाडीतील जलतरण तलावाची स्थिती अशीच आहे. सांगवी आणि चिंचवडगावातील तलाव मात्र नियमितपणे सुरू असतो. नेहरूनगर, यमुनानगर आणि प्राधिकरणातील तलाव वारंवार बंद ठेवले जात असल्याने तेथील पासधारक मोहननगरच्या तलावावर येतात. दोन्ही तलावांत नियमित पोहणारे नियमित सदस्य पर्याय म्हणून मोहननगरच्या तलावात येऊ लागल्याने या तलावावरील ताण वाढला आहे. मोहननगर येथील तलावाच्या फरशा तुटल्या आहेत. दुरूस्तीची अनेक कामे करावी लागतील. अशी परिस्थिती आहे. अशातच या तलावात क्षमतेपेक्षा अधिक लोक हजेरी लावू लागले आहेत. शाळांना सुटी पडल्याने पोहोण्यास शिकविण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. संभाजीनगर येथील जलतरण तलाव खुला केल्यास मोहननगर तलावावरील गर्दी कमी होऊ शकेल. नविन ोला संभाजीनगर येथील तलाव वापरात येईल. असे असताना उद्घाटनानंतर एक महिना उलटला तरी तलाव का खुला केला जात नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. उन्हाळ्यात तलाव सुरू असणे गरजेचे असते. मात्र ऐन उन्हाळ्यातच महापालिकेकडून तलाव बंद ठेवले जातात. वर्षाचे तसेच सहा महिन्यांचे शुल्क भरून जे सदस्य नियमित पोहण्यासाठी येतात. त्यांना त्या पूर्ण कालावधीत पोहोण्याची सुविधा उपलब्ध होत नाही. दुरुस्तीच्या आणि पाणीकपातीच्या सबबीखाली तलाव बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक मोहननगरच्या तलावात पोहण्यासाठी येऊ लागल्याने लवकरच हा तलावही दुरुस्तीकामी बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. बीआरटी मार्ग बससाठी नाही, पण दुचाकींसाठी तरी खुला केला तशाच पद्धतीने तलाव खुले करावेत.