शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त पती जबाबदार'; नवविवाहितेची ३ महिन्यात आत्महत्या

By विवेक भुसे | Updated: September 14, 2022 15:50 IST

लग्नानंतर केवळ ३ महिन्यात नवविवाहितेने आपले जीवन संपवले

पुणे : आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी व घरातील कामे करण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न केले असल्याचे सांगून दुसऱ्या तरुणीबरोबर राहून मानसिक व शारीरीक छळ झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ ३ महिन्यात नवविवाहितेने आपले जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सत्यनारायण घनश्यामदास वैष्णव (वय २५, रा़ शहाद्र, छोटा बाजार, जुन्नी दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरुणा सत्यनारायण वैष्णव (वय २६, रा. खराडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हा प्रकार १० जून ते १३ सप्टेबर २०२२ दरम्यान नवी दिल्ली येथे घडला.

याप्रकरणी सुगनादेवी गोपालदास रांका (वय ४६, रा. चौधरी वस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण व अरुणा यांचा विवाह १० जून २०२२ रोजी झाला होता. सत्यनारायण याचा दिल्लीत इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. त्याचे आईवडिल राजस्थानला राहतात. सत्यनारायण याचे बाहेर दुसऱ्या मुलीबरोबर संबंध होते. त्याविषयी अरुणा हिने विचारणा केली. तेव्हा सत्यनारायण याने तुझ्याबरोबर घरातील कामे करण्यासाठी व सासु सासरे यांचा सांभाळ करण्यासाठी लग्न केले असल्याचे सांगून हाताने मारहाण केली. तिला जेवण न देता, एकत्र न झोपता तिला बाल्कनीमध्ये झोपण्यास लावत.

श्रावण महिना सुरु झाल्याने तिच्या वडिलांनी अरुणा हिला पुण्यात माहेरी आणले. तिचे पतीबरोबर फोनवर बोलणे होत असे. तेव्हा त्याने मी तुला घेऊन जाण्यासाठी येणार नाही़ तू तुझे वडिलांसोबत माझे आई वडिलांचे घरी जा व त्यांची सेवा कर. मी तुझ्यासोबत राहणार नाही, असे म्हणून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेऊन तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अरुणा हिने मंगळवारी सकाळी राहत्या घरासमोर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

फक्त आणि फक्त पती जबाबदारअरुणा आणि सत्यनारायण यांचे फोनवर बोलणे होत असे. तो आपल्या आईवडिलांची राजस्थानला जाऊन सेवा कर, असे तिला सांगत होता. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यानंतर अरुणा हिने चिठ्ठी लिहली. त्यात तिने आपल्या आत्महत्येस फक्त आणि फक्त पती हाच जबाबदार असल्याचे लिहून आत्महत्या केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी