शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याने दोघा मुलांचा खून करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:05 IST

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाकड : ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि. १८) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.दीपक बर्मन (वय ३५, रा. नृसिंह कॉलनी ताथवडे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. शुभम दीपक बर्मन (वय १०) व रूपम दीपक बर्मन (वय ८) असे खून झालेल्या मुलांची नावे आहेत.वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, बर्मन कुटुंबीय ताथवडे येथे संजय ढगे यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. दीपक बर्मन हा सुरक्षारक्षकाचे काम करत. त्याची पत्नी मालतीदेखील जवळच्याच कंपनीत नोकरी करतात. दुपारी घरी शाळेतून आलेली दोन्ही मुले व दीपक हे तिघेच घरी होते. त्या वेळी दीपक याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.दुपारी एक वाजता पत्नीमालती घरी जेवायला आल्या. त्या वेळी पती दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि मुले खाली निपचित पडली असल्याचे मालती यांना दिसले. हे पाहून भांबावलेल्या मालती यांनी आरडाओरडा करताच शेजारी जमा झाले.यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. दोन्ही मुलांना तत्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.शुभम आणि रूपम हे दोघेही येथील बाल सेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अनुक्रमे सहावी आणि चौथीत शिकत होते.दोन्हीही गोड मुलांचा जन्मदात्या पित्यानेच खून केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांचे मन सुन्न झाले. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. दीपक याने नेमके कशामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, या खून आणि आत्महत्येमागे नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनPuneपुणे