शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

दूधसंकलक धास्तावला, अमूलचे संकलन कमी करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:54 IST

उत्तर पुणे जिल्ह्यात दूधउत्पादकांकडे पायघड्या घालत अमूलने दूध संकलन केंद्र सुरू केले; मात्र अलीकडे दुधाची प्रत कमी दर्जाची असल्याचे सांगत अचानक संकलन कमी करण्याच्या सूचना केंद्रांना देण्यात येत आहेत.

टाकळी हाजी : उत्तर पुणे जिल्ह्यात दूधउत्पादकांकडे पायघड्या घालत अमूलने दूध संकलन केंद्र सुरू केले; मात्र अलीकडे दुधाची प्रत कमी दर्जाची असल्याचे सांगत अचानक संकलन कमी करण्याच्या सूचना केंद्रांना देण्यात येत आहेत. त्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकारी दूध संस्थांनी शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव न दिल्यास अमूलसारख्या संस्थेला दूध संकलनाची परवानगी देऊ, असा इशारा दिल्याने दूधसंकलक धास्तावले आहेत. त्यांना परवानगी मिळाली तर हुकूमशाही सुरू होईल, अशी भीती ते व्यक्त करीत आहेत.उत्तर पुणे जिल्ह्यात अमूल संकलन केंद्राच्या चालकांना हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे दर कमी झाल्याने दुधाचे भाव गडगडले आहेत. उत्पादन खर्च भागेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये सरकारविरोधात असंतोष वाढला असून, रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाव कमी मिळण्याचा दोष शासनाच्या धोरणाऐवजी संस्थावर देऊन मोकळे झाले; तसेच गुजरातच्या एका नामांकित संस्थेला दूध संस्थांची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा इशारा त्यांनी दिला.याच दोन वर्षांपूर्वी दूध देण्यासाठी शेतकºयांपुढे पायघड्या घातल्या. गावागावांत दुधाचे केंद सुरू केले; मात्र बाजारभाव कमी होताच संस्थाचालकांना दूध कमी करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. अनेकांचे दूध विविध कारणे देत नाकारले. ज्या तरुणांनी मोठ्या आशेने कर्ज घेऊन संकलन केंद्र सुरू केले, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. ज्यांनी कंपनीविरोधात आवाज उठविला त्यांचे संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. प्रत खराब असल्याची कारणे पुढे केली; मात्र हे सगळे भाव पडल्यावरच का? असा प्रश्न संकलन करणारे विचारत आहेत.सहकारी संस्थांच्या जागा अमूलला नाही : जानकरसहकारी दूध संस्थांच्या जागा भाडेतत्त्वावर अमूलला देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. सहकारी चळवळ मोडीत न काढता वाढविण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी दूध संस्थांच्या जागा कुणालाच देणार नाही, असे राज्याचे पशुसंर्वधन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दूध कमी असताना ३.२ फॅट, व ८.२ स्निग्धांश असलेले दूध स्वीकारत होते; मात्र दूध उत्पादन वाढून, भाव कमी होताच त्यांनी ३.२ फॅटवरून ३.५ फॅट व ८. २ स्निग्धांशवरून ८. ५ वर वाढवून शेतकºयांची अडवणूक सुरू केली आहे. या शिवाय या कंपनीचे खाद्यही शेतकºयाने घेणे बंधनकारक आहे. ते इतर कंपन्यांपेक्षा महाग आहे.सध्या अमूल दोन रुपये जादा दर देण्याचा आव आणत असली, तरी शेतकºयांकडून दुधाची प्रत ही त्याच पद्धतीने घेत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात हिरवा चारा मुबलक असल्यामुळे फॅट व स्निग्धांश लावण्यासाठी शेतकºयांना वाकलेला चारा चढ्या दराने विकत घ्यावा लागतो. त्यातही नुकसान होते.

टॅग्स :milkदूधPuneपुणे