शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

निर्यातीमुळे साखर बाजार स्थिर राहील : दिलीप वळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:58 IST

चांगला मॉन्सून झाल्याने उसाच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. परिणामी साखरेचे उत्पादनही वाढले.

ठळक मुद्दे देशांतर्गत वार्षिक गरज सरासरी २५५ लाख टन

पुणे : परतीच्या पावसामुळे उसाचे वजन वाढले असून, साखर उतारा देखील चांगला मिळाला आहे. परिणामी देशातील साखरेचे उत्पादन तीनशे लाख टनांवर पोहोचले आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या साखर निर्यातीच्या धोरणामुळे स्थानिक बाजारातील भाव टिकून राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. हंगामपूर्व अंदाजात देशात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, चांगला मॉन्सून झाल्याने उसाच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. परिणामी साखरेचे उत्पादनही वाढले. हंगामाच्या सुरुवातीला ४० लाख टन साखर शिल्लकीत होती. आता २९५ ते ३०० लाख टन साखरेची उपलब्धता आहे. म्हणजेच आजच्या घडीला ३३५ ते ३४० लाख टन साखर देशात शिल्लक आहे. देशांतर्गत वार्षिक गरज सरासरी २५५ लाख टन इतकी आहे. त्यामुळे ८० ते ८५ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. या बाबी केंद्र सरकारच्या निर्दर्शनास आणून दिल्या होत्या. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ दरम्यान निर्यात कोटा पूर्ण करणाºया कारखान्यांना आॅक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत शून्य टक्के आयात दराने कच्ची साखर आयात करण्याचा अंतर्भाव देखील या योजनेत आहे. तसेच, सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार निर्यात केल्यानंतरही तोटा होणार असला तरी २० लाख टन साखर देशाबाहेर जाईल. त्यामुळे देशातील साखरेचे दर नियंत्रणात राहतील. त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकºयांना समाधानकारक दर देता येईल, असे वळसे-पाटील म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने