शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

‘सुदर्शन’अस्त्राचा पुण्यात कलाविष्कार; नृत्य महोत्सवातून देव-देविकांचे उलगडले सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:19 IST

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. उषा आर. के. यांच्यातर्फे  ‘दिव्या ट्रिलॉजी’ या नृत्यमहोत्सवाचे सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसादर झालेल्या सुदर्शन अस्त्राच्या कलात्मक आविष्काराने रसिक मंत्रमुग्धसर्जनशील आणि कलाकारांसाठी काहीसा आव्हानात्मक असा हा कलाविष्कार

पुणे : देवी, देवता म्हटले की त्यांच्या तेजस्वितेबरोबरच डोळ्यांसमोर येतात ती त्यांची वाहनं, त्यांना आवडणारी फुले, त्यांची ओळख बनलेली विशिष्ट शस्त्रे. या देवी, देवतांचे दर्शन घडविण्यासाठी अस्त्र, वाहन आणि पुष्प अशा तीन गोष्टींची निवड करून भरतनाट्यम कलाविष्काराद्वारे देवी, देवतांच्या विविध रूपांचे सौंदर्य शुक्रवारी रसिकांसमोर उलगडण्यात आले. या वेळी सादर झालेल्या सुदर्शन अस्त्राच्या कलात्मक आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. उषा आर. के. यांच्यातर्फे  ‘दिव्या ट्रिलॉजी’ या नृत्यमहोत्सवाचे सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या नृत्य महोत्सवाचे ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना व कलावर्धिनीच्या संस्थापिका सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता शमा भाटे, भारतीय विद्याभवनाचे नंदकुमार काकिर्डे आणि डॉ. उषा आर. के. यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.  सर्जनशील आणि कलाकारांसाठी काहीसा आव्हानात्मक असा हा कलाविष्कार. नृत्यातून देवी, देवतांचे पैलू उलगडणे तसे फारसे कठीण नाही, परंतु अस्त्र, वाहन आणि पुष्प या तीन गोष्टींचे रूपक घेऊन नृत्यातून देवी, देवतांच्या रूपांचे प्रकटीकरण करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार पवित्र भट यांनी नृत्यातून ‘ब्रह्मास्त्रा’चे सादरकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार परिमल फडके यांनी कामदेवांच्या पुष्पअस्त्राचे नृत्यातून दर्शन घडवले.  पार्श्वनाथ उपाध्ये यांनी  ‘पिनाक’ अस्त्राचे अत्यंत खुबीने सादरीकरण केले. मिथुन श्याम यांनी विष्णूच्या ‘सुदर्शन’अस्त्राचा कलात्मक आविष्कार घडविला. डॉ. उषा आर. के. यांनी या नृत्याविष्काराची संकल्पना स्पष्ट केली. 

तरुण नर्तक पारंपारक नृत्य करीत आहेत, ही खूपच कौतुकाची बाब आहे. बंगळुरू, पुणे, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली येथील १४ प्रसिद्ध नृत्यकलाकार एकत्र येऊन सादरीकरण करीत आहेत. त्यांच्यामध्ये निखळ स्पर्धा दिसत आहे. यातूनच नृत्याचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.       - सुचेता भिडे-चापेकर

टॅग्स :Puneपुणे