शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

... ‘अशा ’ प्रकारे मावळात विसावल्या एकाच म्यानात दोन तलवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:12 IST

गैरसमजातून प्रश्न निर्माण झाले होते. मतभेद होते, मनभेद नव्हते, असे भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सांगितले..

ठळक मुद्देशिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये दिलजमाई 

पिंपरी : लोकसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर मावळ लोकसभा निवडणूकीतीलशिवसेना भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांत दिलजमाई झाली आहे. राजकीय दृष्टीकोनातून आरोप केले होते, कोणतेही वितुष्ट नव्हते, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गैरसमजातून प्रश्न निर्माण झाले होते. मतभेद होते, मनभेद नव्हते, असे भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. त्यानंतर दहा वर्षांपासून असणाऱ्या बारणे आणि जगताप यांच्यात दिलजमाई झाली. गळाभेटही घेतली. लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षात युती झाली असली तरी गेल्या महिनाभरापासून खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात युती झाली नव्हती. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय राऊत यांनी चर्चो करूनही मनोमिलन झाले नव्हते. रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारणे आणि जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनी मिळून आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी उमा खापरे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे आदी उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, निवडणूक देशहिताची आहे, हेवेदावे बाजूला ठेवून पुढे जायचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मला काही सूचना केल्या. गेल्या दहा वर्षांत कालावधीत केलेले आरोप हे राजकीय दृष्टीकोनातून केलेले होते. आमदार आणि माझ्यात कोणतेही वितुष्ट नव्हते. याबाबतचे आरोप मागे घेत आहे.    आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, आम्ही आत्मपरिक्षण केले. आपण दुसऱ्याची चूक काढतो. त्यावेळी अनेक पश्न पडतात. मात्र, स्वत:ची चूक शोधायला जातो. त्यावेळी खूप मोठ्याप्रमाणावर प्रश्न सुटतात. गैरसमजामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आमच्यात मतभेद होते, मनभेद नव्हते. युतीसाठी, देशासाठी काम करायचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक