शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 14:10 IST

पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला यश हा तरुण कड्यावरुन खाली उतरण्याच्या नादात दरीत अशा ठिकाणी अडकला.

ठळक मुद्देशिवदुर्ग रेस्क्यू टिम व पाटण ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका

लोणावळा : विसापूर किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र व पाटण ग्रामस्तांना यश आले.      पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला यश कासाट (वय 20, रा. पुणे) हा तरुण कड्यावरुन खाली उतरण्याच्या नादात दरीत अशा ठिकाणी आडकला की त्याला  खाली किंवा वर जाता येत नव्हते तो पुर्णपणे संकटात सापडला होता. यश हा त्यांच्या सात मित्रांसह शनिवारी विसापूर किल्लावर फिरण्यासाठी आला होता. किल्ला फिरून खाली येत असताना तो आपल्या मित्रांच्या पुढे चालत असताना वाट भरकटला व एका अवजड कड्यावर अडकून पडला होता. विसापूर किल्याच्या कड्यावर एक तरुण आडकला आहे असे पाटण येथील तरुणांना कळाल्यावर त्याच्या  मदतीसाठी पाटण येथील तरुणांची धावपळ सुरु झाली.  काही लोक कड्याच्या वरुन गेले, काही खाली थांबून त्याला आधार देत होते, संपूर्ण गाव, महिला, मुले रस्त्यावर येवून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती.  गावातील लोकांनी त्याला मदतीसाठी एक जाड जुड दोरखंड वरुन सोडला होता त्याने तो स्वतःच्या कमरेभोवती बांधून घेतला होता, यश हा कड्यावर किंवा कड्याखाली जायचा प्रयत्न करत होता पन दोन तीन तास अडकून बसल्यामुळे त्याची सर्व ताकद संपून गेली होती, हात पाय थरथरत होते, एक थोडीशी चूक त्याच्या जीवावर बेतणार होती.     गावातील लोकांनी त्याला संयम ठेवायला सांगत होते. दरम्यान ग्रामस्तांनी शिवदुर्ग मित्र ह्या लोणावळ्यातील रेस्क्यू टिमला विसापुर किल्ल्यावरील प्रकाराची कल्पना देत मदतीसाठी पाचारण केले.   शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे  योगेश उंबरे, रोहित वर्तक, वैष्णवी भांगरे, अनिल सुतार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड व ग्रामस्त सागर कुंभार, सिध्देश तिकोणे, मयुर तिकोणे, ओंकार कोंडभर, मुकुंद तिकोणे, नितीन  तिकोणे, युवराज तिकोणे, रविंद्र तिकोणे,संभाजी तिकोणे, तुकाराम तिकोणे, विठ्ठल तिकोणे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शिवदुर्गचे योगेश उंबरे व रोहीत वर्तक हे हार्नेस घालून इतर साहित्यासह कड्यावरुन खाली उतरले तर बाकी टीमने रोप फ्रि करुन अँकरिंग करायला घेतली. दोरीच्या साह्याने योगेश खाली यशच्या जवळ गेला रोहीत त्याला बीले करत होता. योगेशने आडकलेल्या यशला हार्नेस घालून रोपमध्ये लॉक करून घेतले व त्याला सुखरुप खाली सोडले. गावातील कार्यकर्ते, तरुण खाली होतेच त्यांनी त्याला गावापर्यंत घेऊन आले. शिवदुर्ग मित्र व पाटण ग्रामस्तांच्या पराकाष्ठेमुळे विसापुर किल्ल्यावर आडकलेल्या तरुणांचे जीव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पर्यटकांनी विशेषतः तरुणांनी गड किल्ले तसेच डोंगर भागात माहिती नसलेल्या ठिकाणी धोकादायकरित्या जाऊन जीवाशी खेळू नये असे आवाहन शिवदुर्ग मित्र टिमच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाFortगडTrekkingट्रेकिंग