शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खासगी बांधकाम साईटवरील वायरमनच्या मुलाचे सी. ए. परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:34 IST

कोरेगाव मूळ (ता. हवेली) परिसरात खासगी बांधकाम साईटवर वायरमन म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या (सी. ए.) पदवीला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे.

ठळक मुद्देकिसन तुळशीराम पांडुळे चार्टड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) झालेल्या मुलाचे नावया माध्यमातून समाजाची सेवा करण्याबरोबर आई-वडिलांची सेवा करणार : किसन पांडुळे

कोरेगाव मूळ : कोरेगाव मूळ (ता. हवेली) परिसरात खासगी बांधकाम साईटवर वायरमन म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या (सी. ए.) पदवीला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे. किसन तुळशीराम पांडुळे (सध्या रा. बोधे-काकडे वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली मूळ रा. महादेववाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हे त्या चार्टड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) झालेल्या मुलाचे नाव असून त्याचे वडील तुळशीराम पांडुळे हे कोरेगाव मूळ परिसरातील 'ड्रीम्स निवारा' या खासगी बांधकाम कंपनीमध्ये मागील काही वर्षापासून वायरमन म्हणून काम करत आहेत.तुळशीराम पांडुळे हे केवळ तिसरी इयत्ता शिकले असून त्यांची पत्नी रुक्मिणी अशिक्षित असून त्यांना दोन मुले आहेत. १९७२ साली सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने कवेत घेतल्यानंतर पांडुळे कुटुंबीय रोजीरोटीसाठी कोरेगाव मूळ परिसरात राहण्यास आले. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करताकरता त्यांनी काही दिवस याच भागातील पोल्ट्रीवर काम केले. पोल्ट्रीमध्ये काम करत असताना, त्यांना वायरमनचे जुजबी ज्ञान मिळाले. दरम्यानच्या काळात त्यांची मुले शाळेत जाऊ लागली होती. आपण शिकलो नाही तरी आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण द्यायचे व त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे या निधार्राने तुळशीराम पांडुळे व त्यांची पत्नी रुख्मिणी यांनी मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. आपल्या आईवडिलांची तळमळ पाहून किसन यानेही आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यास सुरू केला. यातूनच नोव्हेंबर २०१७च्या चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत किसनने यश मिळवले. सोलापूर सारख्या दुष्काळी परिस्थिती असलेल्या व कोरेगाव मूळ परिसरात मोलमजुरी करणाऱ्या पांडुळे दाम्पत्याच्या मुलाने चार्टड अकाऊंटंट परीक्षेत यश मिळल्याने गावकरीही किसनवर खुश आहेत. तर आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल किसनचे आई-वडिलांनाही आपल्या मुलाबद्दल गौरवाची भावना आहे.यशाबद्दल बोलताना किसन म्हणाला, माझे आई वडील शिकले नसले तरी त्यांनी आमच्या शिक्षणासाठी खूप मोठे कष्ट घेतले आहेत. रात्रंदिवस कष्ट करून माझ्या आई-वडिलांनी आमच्या शिक्षणाचा खर्च भागविला आहे. माझे यश त्यांच्या संघर्षाला अर्पण आहे. यापुढील काळात चार्टर्ड अकाऊंटंट'च्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याबरोबर आई-वडिलांची सेवा करणार आहे.

टॅग्स :Puneपुणेchartered accountantसीए