शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतीबाबतचे विधेयक सादर करा, आढळरावांची लोकसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:21 IST

नियम ३७७ अंतर्गत बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी यासंबंधीचे विधेयक केंद्र सरकारने तातडीने लोकसभेत व राज्यसभेत सादर करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज संसदेत केली.

मंचर - नियम ३७७ अंतर्गत बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी यासंबंधीचे विधेयक केंद्र सरकारने तातडीने लोकसभेत व राज्यसभेत सादर करावे, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज संसदेत केली.बैलगाडा शर्यती प्रश्नावर आढळराव पाटील यांनी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत मागणी करताना म्हटले की बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा असलेली स्पर्धा असून ग्रामीण भागातील शेतकºयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तत्कालीन केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यावरण व वन विभागामार्फत सन २०११ मध्ये क्रूरतेपासून संरक्षण करण्याच्या १९६० च्या कायद्यात बदल करण्यात येऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.ही बंदी ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. याबाबत महाराष्ट्र सरकारने तामिळनाडू राज्य सरकारप्रमाणेच राष्ट्रपतींच्या मान्यतेने वटहुकूम काढून बैलगाडा शर्यतींना मान्यता दिली आहे. तमिळनाडू सरकारने तमिळनाडू विधानसभेमध्ये राष्ट्रपतींच्या मान्यतेने वटहुकूम काढून जलिकट्टू स्पर्धा सुरू केल्या आहेत.या स्पर्धांना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबरोबरच बंदी लावण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयात प्राणिमित्र संघटनांनी याविरोधात दावा दाखल केल्याने या शर्यतींना अद्याप मान्यता मिळाली नाही.त्यामुळे तमिळनाडूमध्ये जलिकट्टू सुरू असून महाराष्ट्रात मात्र मुंबई उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिल्यामुळे आजपर्यंत ही बंदी उठू शकली नाही. शेतकºयांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे महाराष्ट्रातील लोक आता आंदोलने व इतर बेकायदेशीर पद्धतीने कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहे.बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, ही शेतकºयांची न्याय मागणी असून, याविषयीचा कायदा पारित करणे हा एकमेव कायमस्वरूपी मार्ग आहे. यासाठी केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीविषयीचे विधेयक तातडीने दोन्ही सभागृहांसमोर मांडून याविषयीचा कायदा करावा, अशी मागणी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत आढळराव पाटील यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव