शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा रुद्रेश गाैडनाैरची रशियामध्ये बालवार्ताहर म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:35 IST

पुण्याच्या 12 वर्षीय रुद्रेश गाैडनाैर याची जागतिक फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप या सामाजिक उपक्रमात बालवार्ताहर म्हणून रशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली अाहे.

पुणे : एखाद्या गाेष्ट अापल्याला मनापासून हवी असेल तर ती अापल्याला नक्कीच मिळते असे म्हंटले जाते. हेच वाक्य पुण्याच्या 12 वर्षीय रुद्रेश गाैडनाैर बाबत खरे ठरले अाहे. रुद्रेशला लहानपणीपासूनच फुटबाॅलची अावड हाेती. लहानपणापासूनच ज्या फुटबाॅल खेळाडूंना ताे टिव्हीवर पाहत हाेता, त्यांना अाता प्रत्यक्ष भेटण्याची संधी त्याला मिळणार अाहे. रुद्रेशची जागतिक फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप या सामाजिक उपक्रमात बालवार्ताहर म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाली अाहे.     तरुणांमध्ये फुटबाॅलचा विकास व्हावा, त्यांनी अाराेग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा, त्याचप्रमाणे सहिष्णुता, खुली विचारसरणी अाणि जगभरातील विविध संस्कृती तरुणांना माहित व्हावी यासाठी फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप हा उपक्रम राबविला जाताे. या उपक्रमाला गॅझप्राॅम अाणि फिफातर्फे उपक्रमाला पाठिंबा देण्यात अाला अाहे. हा उपक्रम यंदा 211 देश अाणि प्रदेशांत विस्तारला अाहे. या उपक्रमात सहभागी हाेण्याचे भारताचे दुसरे वर्ष अाहे. रशियातील माॅस्काे येथे जून 2018 मध्ये रुद्रेश जगभरातून अालेल्या तरुण पत्रकारांना भेटणार अाहे. यावेळी ताे इंटरनॅशनल चिन्ड्रन्स प्रेस सेंटरचा भाग म्हणून फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप कार्यक्रमाच्या सर्व स्थानिक अाणि जागतिक स्तरावरील उपक्रमांचे वार्तांकन करणार अाहे. त्याचबराेबर उपक्रमाच्या नऊ मूल्यांबाबत जागरुकता वाढवण्याचेही काम करणार अाहे.     रुद्रेशच्या घरची परिस्थीती तशी बेताचीच अाहे. त्याचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अापला मुलगा रशियाला जाणार हे कळाल्यावर त्यांना खूप अानंद झाला. रुद्रेश पुण्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय या महापालिकेच्या शाळेत अाठवी इयत्तेचा विद्यार्थी अाहे. त्याने वयाच्या अाठव्या वर्षापासून फुटबाॅल खेळायला सुरुवात केली. त्याचे प्रशिक्षक विष्णुसर यांच्यामाध्यमातून त्याला या उपक्रमाबाबत माहिती मिळाली हाेती. त्याने फुटबाॅल या खेळाबद्दल लिहिलेल्या निबंधामुळे त्याची या उपक्रमासाठी निवड झाली अाहे. रुद्रेश साेबतच बंगळुरु येथील 12 वर्षीय सूर्या वरिकुटी याची भारतातर्फे तरुण फुटबाॅलपटू म्हणून निवड झाली अाहे. भारतातर्फे सहभागी झालेले हे दाेघेही फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेचा उद्घाटन साेहळा अाणि पहिला सामनाही पाहणार अाहेत. रुद्रेशच्या या यशात त्याचे प्रशिक्षक अजयसर, विष्णुसर अाणि त्याचा काेथरुड व्हाेल्वज या संघाचा माेठा वाटा अाहे. 

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडाFootballफुटबॉलreporterवार्ताहर