शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुळशी तालुक्यातील तलावात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 22:25 IST

पर्यटनासाठी आले असता घडली दुर्दैवी घटना 

पिरंगुट : फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मुळशी तालुक्यातील खांबोली येथील तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार (दिनांक 20) रोजी घडली असुन ओजस आनंद कठापुरकर (वय २२, रा. प्राधिकरण निगडी, पुणे) आणि राज संभाजी पाटील (वय २२, रा. अमळनेर जळगाव) अशी या दोन मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकणारे आदेश राजेंद्र भिडे,सुमेध सतीश जोशी,प्रशांत संभाजी आरगडे, तेजस्विनी साहेबराव पवार, निधी सत्यनारायण हळदंडकर, तृप्ती चंद्रकांत देशमुख,चैतन्या जयंत कांबळे,ओजस आनंद कठापुरकर आणि राज संभाजी पाटील हे विध्यार्थी रविवारी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे पर्यटनासाठी मुळशी तालुक्यांमध्ये आले होते तेव्हा ते सकाळी नऊ वाजण्या च्या सुमारास खांबोली येथील तलावाजवळ फिरण्यासाठी आले असता ते सर्व जण तलावाच्या पाण्यात उतरले होते त्यावेळी कदाचित पाण्याचा व गाळाचा अंदाज न आल्याने ओजस कठापुरकर आणि राज पाटील हे गाळात अडकून बसले त्यावेळी उर्वरित विध्यार्थी हे पाण्यातून लागलीच बाहेर पडले परंतु या दोघांना पाण्यातून बाहेर पडता आले नाही 

त्यावेळी इतरांनी ओजस कठापुरकर याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता कारण त्या विध्यार्थ्यांला पाण्यातुन बाहेर काढून पुढील उपचारासाठी तेथील स्थानिक डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले होते. 

तर राज पाटील या विध्यार्थ्यांला देखील वाचविण्यात इतर विद्यार्थ्यांना अपयश आले त्यामुळे बराच वेळ झाला तरी त्याचा मृत्यू देह देखील आढळून आला नाही शेवटी अग्निशामक दलाच्या जवानानी शोध घेतला असता  राज पाटील या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दुर्दैवी रित्या मृत्य पावलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हे शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले

या दरम्यान पौड पोलीस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी घटनास्थळाला भेट देऊन तेथील पाहणी केली होती तर पोलिस हवालादार रविद्र नागटिळक,ईश्वर काळे,अमोल सूर्यवंशी,अग्नीशामकचे जवान व ग्रामस्थ यांनी या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली तर या संपूर्ण घटनेचा पुढील तपास हा पौड पोलिस स्टेशनंच्या वतीने सुरु आहे.