शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची ‘आयटीआय’ला पसंती, राज्यात ८४ टक्के प्रवेश : रिक्त जागा व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:09 IST

राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत.

पुणे : राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत. दरम्यान, रिक्त जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणकी एक संधी देण्यात आली.राज्यात शासकीय संस्थांमध्ये या वर्षी ९३ हजार ४७६ तर खासगी संस्थांमध्ये ४२ हजार ६७४ एवढी अशी एकूण १ लाख ३६ हजार १५० प्रवेशक्षमता आहे. त्यासाठी तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दि. ४ सप्टेंबर अखेरपर्यंत शासकीय संस्थांमध्ये ८४ हजार ७८१ तर खासगी संस्थांमध्ये ३० हजार २०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यानुसार सध्या अनुक्रमे ८ हजार ६९५ व १२ हजार ४७३ अशा एकूण २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत.राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशाचा विचार केल्यास यंदाही जवळपास ४० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या तुलनेत आयटीआयचे प्रवेश सुमारे ८४ टक्के झाले आहेत. त्यातच रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे.त्यामुळे यातील आणखी काही जागा भरतील. ‘केवळ कमी मागणी असलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश कमी झाले आहेत. हे व्यवसाय स्वयंरोजगारासाठी उपलब्ध आहेत. इतर व्यवसायांना चांगला प्रतिसाद आहे,’ असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक अनिल जाधव यांनी सांगितले.शासकीय संस्थांमध्ये एकूण ८ हजार ६९५ जागा, तर खासगी संस्थांमध्ये १२ हजार ४७३ जागा रिक्त आहेत. अद्याप आॅनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना दि. १२ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून प्रवेश अर्ज भरावा लागेल. यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. शासकीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी दि. १३ सप्टेंबर रोजी विशेष समुपदेशन फेरी घेतली जाणार आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रत्यक्ष संबंधित संस्थेत हजर राहावे लागेल. हजर विद्यार्थ्यांची गुणवत्तायादी लावून त्यानुसार प्रवेश दिला जाईल. खासगी संस्थांमध्ये दि. १३ सप्टेंबरपर्यंत संबंधित संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेता येईल.

टॅग्स :Studentविद्यार्थी