शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:58 IST

पुणे : महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुक्रमे १५ व २५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लवकरच संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

पुणे : महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुक्रमे १५ व २५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लवकरच संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या वर्षी प्रथमच ही योजना संपूर्ण आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी १५ हजार रुपये देणारी मौलाना अबुल कलाम आझाद व इयत्ता १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही २५ हजार रुपये देणारी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यासाठी खुल्या गटाला ८० टक्के, मागासवर्गीय गटाला ७० टक्के, अपंगांना ६५ टक्के गुणांची अट आहे. दर वर्षी या योजनेसाठी महापालिका अर्ज मागवून घेते. या वेळी मात्र त्यासाठी संपूर्ण आॅनलाईन पद्धत अवलंबिवण्यात आली आहे.त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचा बँक खाते क्रमांकही घेण्यात आला आहे. इयत्ता १२ वीसाठी २ हजार ५०० अर्ज आले आहेत, तर १०वीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ६ हजार ३९८ आहे. यातील काही अर्जांमध्ये त्रुटी होत्या. त्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिल्यामुळे योजनेला विलंब होत गेला, अशी माहिती मुख्य समाजविकास अधिकारी संजय रांजणे यांनी दिली.आता येत्या ८ डिसेंबरपर्यंत त्यांना त्रुटी दूर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. काय त्रुटी आहेत्,ा हे त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून कळविण्यात आले आहे. त्यांनी मुदतीत त्रुटी दूर केली नाही, तर त्यांचा अर्ज नाकारला जाईल, असे ते म्हणाले.महापालिकेने अंदाजपत्रकात या योजनेसाठी १६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आणखी काही रक्कम लागणार आहे; मात्र वरिष्ठ स्तरावरून पदाधिकाºयांशी संपर्क साधून त्याचे वर्गीकरण केले जाते. या योजनेसाठी आतापर्यंत एकदाही पैसे नाहीत असे झालेले नाही, अशी माहिती समाजविकास विभागाकडून देण्यात आली. या वर्षीच्या सर्व अर्जांची छाननी झाली आहे. वरिष्ठ व पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लवकरच सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे रांजणे यांनी सांगितले. आॅनलाईन पद्धत अवलंबल्यामुळे या वर्षी ही योजना विनाविलंब राबवली जात आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना महापालिका राबवीत असून आतापर्यंत काही लाख विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला असल्याचे रांजणे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे