शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी जुन्याच गणवेशावर! अद्याप पैैसे खात्यात आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:52 IST

शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.

कान्हूर मेसाई - शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत तथा केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. मात्र खरेदी करावयाची शालेय रक्कम विलंब झाल्याने पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १६ दिवस झाल्यानंतरही जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.दरम्यान, प्रशासकीय प्रक्रियेत आणखी दिवस जाणार आहेत. केंद्र सरकारने गत काही महिन्यांत देशात सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानाला समग्र शिक्षा अभियानात समाविष्ट केले आहे. केंद्रच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकारात येत असलेल्या या समग्र शिक्षा अभियानाकडून राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेशासाठी आत्तापर्यंत ४00 रुपये दिले जायचे. मात्र एवढ्या अल्पशा रकमेत दोन गणवेश बसणार कसे? याबाबत ओरड झाल्याने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून २00 रुपयांची वाढ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यासाठी ६00 रुपयांची तरतूद केली आहे.या वर्षी शालेय व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचा निधी सोपवून विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी १५ जूनला शाळा सुरू झाल्यानुसार मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच वाटप करण्यातआली. त्याप्रमाणेच मोफत गणवेशदेखील पहिल्या दिवसापासूनच मिळणे अपेक्षित होते. मात्र शालेय गणवेशासाठीचा निधीला विलंब झाल्याने आतापर्यंत जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे.पंचायत समितीकडे निधी सुपूर्त केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गटविकास अधिकारी संदीप जठार याना विचारले असता, गणवेश निधी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून शाळेकडे पात्र विद्यार्थी संख्येनुसार निधी वितरित केला जाईल. त्यानुसार हा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना गणवेश वितरण केले जाणार आहे. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी कान्हूर मेसाई येथील माजी उपसरपंच दीपक तळोले व माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे यांनी केली आहे.शालेय व्यवस्थापन समितीची मुख्य भूमिका!शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली. मात्र, त्या निर्णयाचा मोठा फटका शालेय गणवेश वितरण प्रक्रियेला बसला होता. तो अनुभवलक्षात घेता या वर्षी संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा न करता शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका मुख्य राहणार आहे.गेल्या वर्षीपासून गणवेशाचे पैैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरूवात केली. यामुळे अर्धे वर्षे बँकेत खाती काढण्यात गेली. त्यानंतर काहींचे पैैसे झाले तर काहींना पैैसै मिळालेच नाहीत. त्यामुळे गेले वर्षे गणवेशा विनाच गेले.या वर्षी तरी वेळेत प्रक्रिया होवून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी