शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भंगारातून बनवली विद्यार्थ्याने नवी कोरी दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:56 PM

निडगी येथून भंगारातून आठ हजार रुपये देत आणलेल्या गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली.

ठळक मुद्देगाडी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषयगाडी बनवण्याच्या वेडापायी त्याने सोमेश्वरनगर येथील इंजिनिरिंगच्या मेकॅनिकल शाखेत प्रवेश

सोमेश्वरनगर : लहानपणापासून दुचाकीचे वेड...आपले गाडी बनवण्याचे वेड पूर्ण करण्यासाठी निडगी येथून आठ हजार रुपये देत आणलेल्या स्क्रॅब गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली. रत्नसिंह गाडगे असे या तरुणाचे नाव असून त्याची गाडी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.    मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या रत्नसिंहला लहानपणापासूनच दुचाकी गाड्यांचे वेड आहे. आई-वडील दोघे प्राथमिक शिक्षक आहेत. या वेडापायी त्याने सोमेश्वरनगर येथील इंजिनिरिंगच्या मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतला. गेल्यावर्षी स्क्रॅप झालेली गाडी त्याने आणली. गाडीची स्थिती बघता सर्वांनीच त्याचा गाडी आणण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. शेजारी दिलीप सोरटे यांच्या जुन्या दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये नवीन बाईक बनवण्याचे त्याचे काम सुरू झाले. गाडीचे नवीन भाग घेण्यासाठी स्वत:जवळचे साठवलेले पैसे कामी आले. मग हळूहळू एक एक भाग मिळवले. त्याचे मित्र सूरज जाधव व अतुल होळकर यांनी नीरा येथील अस्लम पठाण यांच्याशी संपर्क केला, त्यांनी पार्ट शोधून देण्याची तयारी दाखवली.मुंबई येथून त्यांच्या गॅरेजमध्ये साहित्य त्याने आणले. अविनाश गायकवाड यांनी गाडीचे रंगाचे काम करण्याची तयारी दर्शवली. रत्नसिंहने स्वत: गाडीचे सॉफ्टवेअरचे डिझाईन तयार केले.  गाडीच्या लिवरचे डिझाईन शेजारीच स्वप्निल गायकवाडसह त्याने राम आर्टस येथे तयार केले. गाडीचा पुढील हेडलाईट अद्याप मिळालेला नव्हता. तो वडगाव येथील प्रवीण चोरगे व महेश चोरगे या बंधूंनी शोधून दिला.२८ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री उशिरा त्यांच्याशी बोलत असताना फोनवरून त्यांनी फ्यूज पाहून तो जळाला असल्याचे पाहिले. गायकवाड यांनी त्यांच्याकडील वायर दिली आणि त्यादिवशी त्याची दुचाकी जिवंत झाली.बाकी पार्ट बसवण्यासाठी प्रवीण सोरटे यांनी होकार दिला. शोरूमचे वर्कशॉप मॅनेजर तांबवे, संदीप वाइकर, जावेद तसेच इतर सर्व स्टाफ ने मदत केली. अशा प्रकारे रत्नसिंह या विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीतून त्याचे बाईक बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

टॅग्स :BaramatiबारामतीStudentविद्यार्थी