शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकली सिताफळाची बी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 19:38 IST

शिक्रापुर येथील एका तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत सिताफळाची बी अडकली होती.

ठळक मुद्देफुफ्फुसामध्ये उजव्या श्वास कमी पोहचत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास डॉक्टरांच्या पथकाने ब्रान्कोस्पोपी करून नलिकेत अडकलेली सिताफळाची बी काढली बाहेर

पुणे : तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकलेली सिताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. दोन्ही घटनांमधील रुग्णांची स्थिती शस्त्रक्रियेनंतर स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.पहिल्या घटनेमध्ये शिक्रापुर येथील एका तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत सिताफळाची बी अडकली होती. तीन दिवसांपुर्वी सिताफळ  खाल्ल्यानंतर त्याला अचानक खोकला सुरू झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊनही हा खोकला कमी झाला नाही. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसामध्ये उजव्या श्वास कमी पोहचत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर छातीची क्ष-किरण तपासणी करण्यात आली तेव्हा श्वसन नलिकेत काही तरी अडकल्याचे दिसले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ब्रान्कोस्पोपी करून नलिकेत अडकलेली सिताफळाची बी बाहेर काढली. या पथकामध्ये कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोशी, डॉ. संजय सोनावणे, डॉ.अपुर्व वर्मा, डॉ. रुपाली बोरकर, डॉ. किर्ती कुंडलवाल यांचा समावेश होता. दुसऱ्या घटनेत मुळच्या नेपाळमधील १५ वर्षीय सुरज सावंत या मुलाच्या नाकात सहा वर्षांपुर्वी लाकडाचा तुकडा अडकला होता. तो झाडावरून खाली पडल्याने लाकडाचा तुकडा डाव्या डोळ्याला छेद देऊन त्याच्यानाकात अडकला. स्थानिक रुग्मालयात डोळ्यातील तुकडा काढण्यात आला. पण सहा वर्ष उपचार घेऊनही त्याचा त्रास कमी झाला नाही. ससून रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या नाकाचे सी.टी. स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये ८ सेंटीमीटर लांबीचा लाकडाचा तुकडा नाकात अडकल्याचे निदर्शनास आले. एंडोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे हा तुकडा बाहेर काढण्यात आला. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समीर जोशी, डॉ. राहुल ठाकूर, डॉ. गुनित कौर, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. प्राजक्ता तायडे यांच्या पथकाने शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलhospitalहॉस्पिटल