शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून संघर्ष; काँग्रेसमध्ये संघर्ष यात्रेवरून गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:51 IST

प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाºयांनी या मतभेदांचे दर्शन घडवले.

पुणे : महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २५ वरून थेट ९ पर्यंत आली, तरीही काँग्रेसमधील मतभेद व पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न काही संपायला तयार नाहीत. प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाºयांनी या मतभेदांचे दर्शन घडवले.राज्य सरकारच्या विरोधात ३१ आॅगस्टला पश्चिम महाराष्ट्रातून काढण्यात येणाºया जनसंघर्ष यात्रेचे नियोजन करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण असे दोन माजी मुख्यमंत्री शनिवारी पुण्यात आले होते. त्यांनी काँग्रेस भवनामध्ये सकाळी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा असा प्रवास करीत ही यात्रा पुण्यात ६ सप्टेंबरला रात्री येईल. पुण्यातच ७ किंवा ८ सप्टेंबरला बीजे मेडिकल ग्राऊंडवर यात्रेचा समारोप करणार आहे. या दोन मार्गांवरून मतभेद निर्माण झाले. नेत्यांसमोरच वादावादी सुरू झाली.राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे वावडे का आहे, असा सवाल एका नेत्याने केला व राहुल गांधी आले होते त्याही वेळी त्यांना तिथे येण्यापासून थांबवण्यात आले, अशी आठवणही दिली. यावर दुसºया नेत्याने यात्रा लांबून कशाला न्यायची, असा सवाल केला. लक्ष्मीनगरमधून नेली तर चांगले होईल, असा दावा केला. लक्ष्मीनगरचा रस्ता चिंचोळा आहे, त्यापेक्षा मोठ्या रस्त्याने नेल्यास अडचण होणार नाही, असा युक्तिवाद त्यावर करण्यात आला. अखेरीस चव्हाण यांनीच ‘नंतर पाहू’ म्हणत त्यात मध्यस्थी केली. आता या मतदारसंघातील यात्रेचा नक्की मार्ग कोठून जाणार, याबाबत राजकीय औत्सुक्य निर्माण झाले आहे.मार्ग निश्चित : मात्र, लांबचे कारण देत बदललायात्रेचा मुक्काम असल्यामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरून यात्रा न्यावी, अशी सूचना चव्हाण यांनी केली. त्यावर सर्वच विधानसभा मतदारसंघांत यात्रा न्यावी, असा निर्णय झाला. यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले. पर्वती मतदारसंघातून यात्रा कशी न्यायची, यावर दोन नेत्यांमध्ये मतभेद झाले. गंगाधाम चौकातून ती सुरू होईल, शिवदर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमार्गे दांडेकर पुलावर येईल, असे ठरले. हा मार्ग लांबचा होईल, असे म्हणत एका नेत्याने यात्रा लक्ष्मीनगरमधून दांडेकर पुलाकडे नेण्यास सुचविले.

टॅग्स :congressकाँग्रेस