शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किर्लोस्कर न्युमॅटिकच्या कामगारांवर लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:45 IST

कुटुंबांसहित सत्याग्रह : चर्चा न करण्याची प्रशासनाची भूमिका; १३१ कामगारांना कमी केल्याने आंदोलन

हडपसर : किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीमधील आंदोलन चिघळले असून प्रवेशद्वारावर कुटुंबांसहित आंदोलन करणाऱ्या कामगारांना पांगविण्यासाठी शनिवारी पोलिसांनी लाठीमार केला. एका महिलेसह ६६ आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. १३१ कामगारांना नोकरीतून कमी केल्याने त्यांनी गेल्या ४१ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.

कामगारांनी शनिवारी कुटुंबासहित आंदोलन करण्याचा पवित्र घेतला. प्रवेशद्वारावर आज मोठा पेच निर्माण झाला होता. आंदोलकांनी आतील कामगारांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी या आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, आंदोलकांनी आपल्या घोषणा तशाच चालू ठेवल्या. तेथून जाणाºया कचºयाच्या गाडीखाली झोपण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील किर्लोस्कर न्युमॅटिक कामगार संघटनेतील सर्वच्या सर्व म्हणजे १३१ कामगारांना बडतर्फ केले आहे. त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कामगारांना परत कामावर रुजू करून घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अभिजित आडागळे, उपाध्यक्ष लकन तांबे, जनरल सेक्रेटरी सचिन सुरवसे, अशोक गंजाळ, आंबादास चाकणे, बिपीन कावळे, अजित देवकर यांनी दिला होता. 

टॅग्स :Puneपुणे