शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संप सोमवारी संध्याकाळपर्यंत स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 10:29 PM

पुण्यात निवासी डॉक्टरांची शनिवारी संध्याकाळी प्रशासनासोबत बैठक झाली.

पुणे: पुण्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना  ससूनमध्ये प्रशासनाने बेड वाढवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र  या निर्णयाला विरोध दर्शवित व पुरेशा मनुष्यबळासह काही मागण्यांसाठी ससूनमधील निवासी प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटना असलेल्या मार्डने काम बंद ठेवत संप पुकारला होता. मात्र प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांनी संप सोमवारी (दि.१९) संध्याकाळपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्यात निवासी डॉक्टरांची शनिवारी संध्याकाळी प्रशासनासोबत बैठक झाली.त्यात आम्हाला आमच्या मागण्यांबाबत लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याची माहिती 'मार्ड 'ने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रशासनाने ससून मधील कोरोना रुग्णांच्या बेड्स मध्ये कुठलीही वाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी(दि.१९)  संध्याकाळपर्यंत संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकात दिली आहे. 

कालच पालकमंत्री अजित पवार यांनी ससूनमधले बेड वाढवणार नाही. अस जाहीर केलं होतं. पण आमच्यापर्यंत हा निर्णय लेखी पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही केवळ क्रिटिकल सेवा पुरवू. असे डॉक्टरांच म्हणणं आहे. तसेच डॉक्टरांच्या काही मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी बारा तासाच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात उमटतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे. 

सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढवले तर १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आहोत. रुग्णसेवा अविरत चालू आहे. गेल्या एक दीड महिन्यापासून आमच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. डॉक्टरांच्या सर्व अडचणी आणि त्यावरील उपायही आम्ही प्रशासनाला सुचवून दिले आहेत. पण ते याची दखल घेत नाहीत. असेही त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरAjit Pawarअजित पवार