शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ठरवलेल्या दुधाच्या हमीभावाला खासगी संस्थांचा हरताळ; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:47 IST

राज्य सरकारने दुधाचा हमीभाव २७ रुपये लिटर जाहीर केला असतानाही खासगी व सहकारी दूध संस्थांनी बाजारभाव कमी केले आहेत. दुधाचे बाजारभाव लिटरला २० ते २२ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देसरकारचा निर्णय जाहीर होताच खासगी दूध संस्थांनी सुरुवातीस दर कमी करण्यास केली सुरुवातसध्या दुधाचा भाव २० ते २२ रुपये असा असून लिटरमागे ५ ते ७ रुपयांनी दर कमी

मंचर : राज्य सरकारने दुधाचा हमीभाव २७ रुपये लिटर जाहीर केला असतानाही खासगी व सहकारी दूध संस्थांनी बाजारभाव कमी केले आहेत. दुधाचे बाजारभाव लिटरला २० ते २२ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतोय; मात्र दुधातून काहीच हाती लागत नसल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दि. १ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप केला होता. शेतमाल व दूध बाजारात न पाठविल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. आंदोलनाची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. त्या वेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दुधाचा हमीभाव ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ दुधाला हमीभाव २४ रुपयांवरून २७ रुपये करण्याचे जाहीर केले. प्रति ३.५ फॅटच्या पुढे प्रतिपॉर्इंट ३० पैसे भाव जाहीर केला. त्या वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारचा निर्णय जाहीर होताच खासगी दूध संस्थांनी सुरुवातीस दर कमी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरकारी दूध संस्थांचे दर कमी झाले. सध्या दुधाचा भाव २० ते २२ रुपये असा असून लिटरमागे ५ ते ७ रुपयांनी दर कमी झाले आहेत. १ डिसेंबरपासून पॅकिंगव्यतिरिक्त लागणारे जादा दूध आम्ही खरेदी करणार नाही, अशी धमकी सर्व सहकारी संघांनी एकत्रित येऊन राज्य सरकारला दिल्यामुळे दुधाचे दर कमी करण्याबाबत पुनर्विचार करू, असे आश्वासन दुग्धविकासमंत्र्यांनी सहकारी संघांना दिले. त्यामुळे सहकारी संघानेदेखील दुधाचे दर खाली आणले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दूधदरवाढीची केलेली घोषणा फसवी ठरली आहे, अशी प्रतिक्रिया दूधउत्पादक शेतकरी देत आहेत. सरकारचे दुग्धव्यवसायावर नियंत्रण नाही. त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी भरडला जातोय. दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहता गाईच्या दुधाला किमान ३५ रुपये दर हवा, तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपये दर मिळाल्यास शेतकऱ्याला परवडेल. लिटरमागे ३० ते ३२ रुपये खर्च येतो. 

टॅग्स :Puneपुणे