शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आयटीपार्क मध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकीलवर हल्ला; वेळीच सुटका झाल्याने प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 22:24 IST

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

हिंजवडी : घरा समोरील मोकळ्या जागेत खेळत असणाऱ्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. केवळ दैव बलवत्तर म्हणून नागरिकांनी तिची वेळीच सुटका केल्याने तीचे प्राण वाचले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलेचे प्राण थोडक्यात वाचले असून, तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते.

अलिशा शेख (वय ४)  राहणार बोडकेवाडी, माण असं चिमुकलीचे नाव असून, सध्या ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सध्या, माण परिसरात भटक्या कुत्र्यांची नवनवीन टोळकी रात्रीच्या अंधारात कोठून अवतरतात हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे. तर,  महापालिकेच्या हद्दीतील मोकाट कुत्री रात्रीच्या अंधारात  हिंजवडी, माण परिसरात सोडली जातात अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात आहे. आता पर्यंत माण, हिंजवडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक ग्रामस्थ जायबंदी झाले आहेत.

विशेष म्हणजे एकट्या बोडकेवाडीत दोघांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नाहक  आपले प्राण गमावले लागले आहेत. मोकाट कुत्री एवढी हिंस्र होतात तरी कशी? त्यांच्यावर आवर कोण घालणार  असा प्रश्न आता स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहे. अलिशाच्या पालकांशी संपर्क साधला असता, बोडके वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस  घातला असून, वेळीच लक्षात आल्याने अलिशाला जखमी अवस्थेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याचे सांगितले. मात्र, मोकाट कुत्र्यांमुळे  येथील नागरिकांचे जगणं अक्षरशः मुश्किल झाले असून, याची प्रशासनाने वेळीच दाखल घ्यावी अशी आग्रही मागणी माण आयटीपार्क परिसरातून होत आहे.