शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

एफटीआयआयच्या माजी कर्मचा-यालाच संस्थेत केला प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:05 IST

१९७४ मध्ये संस्थेमध्ये रूजू झालेल्या कर्मचा-याबरोबरच आपल्यालाही रूजू पत्र मिळाले, दोघांचे पत्र समान असून त्याला पेन्शन मिळते, मग मी काय अपराध केलाय? असा प्रश्नही उपस्थित केला.

ठळक मुद्देएफटीआयआय कर्मचारी पेन्शन प्रकरण : १९७५ पासून सेवेतअनेक वर्षांपासून एफटीआयआयचे कर्मचारी पेन्शन मिळण्यासाठी संघर्षशील

पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) सारख्या प्रतिष्ठित संस्थेत इतकी वर्षे नोकरी केली. मात्र, त्या संस्थेकडून काय मिळाले तर उपेक्षा. हक्काची पेन्शन तर मिळत नाही; त्यासाठीच झगडतोय. पण सातत्याने विचारणा करतोय म्हणून संस्थेची दारेच आमच्यासाठी बंद करण्यात आली आहेत. सांगा, आम्ही कुठ जायचं?...हे भावनिक बोल आहेत, १९७५पासून संस्थेची सेवा केलेल्या एस.के वीर यांचे.     १९७४ मध्ये संस्थेमध्ये रूजू झालेल्या कर्मचा-याबरोबरच आपल्यालाही रूजू पत्र मिळाले, दोघांचे पत्र समान असूनही त्याला पेन्शन मिळते, मग मी काय अपराध केलाय? असा प्रश्नही वीर यांनी उपस्थित केला. अनेक वर्षांपासून एफटीआयआयचे कर्मचारी पेन्शन मिळण्यासाठी कर्मचारी संघर्ष करीत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही. ‘फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटूट आॅफ इंडिया ( एफटीआयआय) ही संस्था १९७४ मध्ये स्वायत्त  झाली. संस्थेच्या नियमाप्रमाणे १९८२ मध्ये नियामक मंडळाला मान्यता मिळाली. त्यामुळे इतर शासकीय संस्थाना लागू होणारे नियम संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही लागू झाले. जे कर्मचारी १९७४ नंतर रूजू झाले आहेत, त्यांच्या पगारातून जीपीएफ कट करण्यात येत होता. याशिवाय कामावर रूजू होताना पेन्शनचा अर्ज देखील भरून देण्यात आला होता. मात्र, संस्थेने अचानक त्यात बदल करून कॉंन्ट्रिब्यूटरी प्रॉव्हिडंट फंड ( सीपीएफ) योजना लागू केली आणि १९७४ पासूनच्या कर्मचाºयांनाही त्यात समाविष्ट करण्यात आले. मात्र, हा बदल करताना कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. संस्थेने ही योजना सुरू करताना प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. या विषयासंदर्भात माहिती अधिकारात काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कर्मचा-यांचे पेन्शन बंद केल्याचे एकही रेकॉर्ड केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि अर्थ खात्याकडेही उपलब्ध नाही. तसेच सीपीएफ योजना सुरू करण्याची कॉपीही संस्थेकडे नाही. प्रशासनाने केलेला बदल धर्मादाय आयुक्तांकडे कळविणे बंधनकारक असतानाही तसे झालेले नाही. केवळ एफटीआयआयच्या प्रशासनाने पीएफच्या कार्यालयाला पेन्शन संदर्भातील कागदपत्रे पाठविली नसल्यामुळे आज अनेक कर्मचारी पेंन्शनपासून वंचित राहिले आहेत.      पेन्शन योजनेमध्ये जनरल प्रॉव्हिडंट फंड ( जीपीएफ) च्या जागी कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड ( सीपीएफ) अशी खोडाखोड करून कर्मचा-यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्षांसह संचालक आणि विश्वस्तांविरोधात एका कर्मचा-याने दाखल केलेल्या दाव्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी गुळवे पाटील यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते, असे असतानाही एफटीआयआयच्या संचालकांकडून चौकशीला कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना न्यायालयाकडून ‘तारीख पे तारीख’ मागण्याची वेळ येत आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान पुन्हा १५ मे ची तारीख न्यायालयाक डून देण्यात आली आहे. दरम्यान, आमच्याकडे कोणतीच माहिती नसल्याचा दावा करणा-या संस्थेच्या संचालकांना माझ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या तब्बल १६ फाईल्स दिल्या आहेत. त्यांनी त्या फाईली दाबल्या असल्याचा आरोप वीर यांनी केला. ’ आमच्याकडे कागदपत्रे नाहीत असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला म्हणत आहेत. मी त्यांना पुन्हा एकदा कागदपत्रांची नवीन फाईल देण्यास तयार आहे. ती फाईल ते मुंबईच्या फिल्म डिव्हिजनला पाठवणार का?- एस.के वीर, माजी कर्मचारी, एफटीआयआय

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला