शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कोऱ्हाळेकरांचा रास्ता रोको

By admin | Updated: March 26, 2017 01:28 IST

महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केल्याने कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील सार्वजनिक

वडगाव निंबाळकर : महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केल्याने कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासुन बंद आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत .नागरीकांच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी व महावितरणच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नीरा बारामती मार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसही आंदोलकांची समजूत घालत होते. पण ग्रामस्थांचे पाणी बंद रस्ता बंद... महावितरणचा निषेध असो, अशा घोषणा तीव्र होत होत्या. महावितरणचे अधिकारी लवकर आले नाहीत .अखेर पोलिसांनी संबधीतांना फोनवरून आंदोलनस्थळी लवकर उपस्थित रहा, असे कळवले. यानंतर महावितरण कार्यालयातील प्रज्ञेश जाधव, सोमेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे येथे पोहोचले. त्यांनी आंदोलकांचे मत ऐकुन घेतले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मंडलअधिकारी उदय कदम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपस्थीत होते. आंदोलनात दिलीप खोमणे, रवींद्र खोमणे, अंकुश चव्हाण, अनिल चव्हाण, नंदकुमार मोरे, महेश चव्हाण, हरिचंद्र पवार, कासमभाई सय्यद आदी उपस्थित होते.(वार्ताहर)आडमुठे धोरण : अधिकाऱ्यांशी चर्चागेल्या पंधरा दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा बंद पडल्याने ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. महावितरण कंपनीने आडमुठे धोरण अवलंबले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही कोऱ्हाळे बुद्रुक येथील ग्रामस्थ जमलो आहोत, अशा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आले.