शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा दाबला आवाज... महापौरांचा चढला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 16:54 IST

पुण्यातील नागरी समस्यांवरून विरोधक बरसले

ठळक मुद्देसर्वसाधारण सभा :

पुणे : महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षांनी प्रतिकात्मक झोपा काढत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. सभा सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बराटे यांचे बोलणे संपताच तहकुबी मांडण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांचे नगरसेवक संतापले. त्यांनी आपले म्हणणे मांडू देण्याची विनंती केली. परंतु, महापौर मुक्ता टिळक यांचा यावेळी पारा चढला. त्यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिले नाही.आचारसंहिता लागल्यानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. या सभेला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवकही या सभेला उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी घंटा वाजवीत महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली. झोपलेल्या प्रशासनाचा निषेध असा मजकूर असलेले बॅनर्स अंगावर घेऊन नगरसेवक एड. भैय्यासाहेब जाधव आणि योगेश ससाणे यांनी झोपून घोषणाबाजी केली. तसेच विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगतपा, दीपक मानकर, अविनाश बागवे,  नगरसेविका अश्विनी जगताप, यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या.महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वांना जागेवर बसून आपापले विषय मांडण्याची विनंती केली. त्यानुसार, सर्व सदस्य जागेवर गेले. त्यानंतर दिलीप बराटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बराटे म्हणाले, 'आचारसंहिता संपत आली. दिवाळी संपली. परंतु अद्यापही शहरातील कामे सुरू झालेली नाहीत. पावसाळ्यात ज्या ज्या रस्त्यांवर पाणी तुंबले, त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली तेथे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा ठिकानांची यादी केली आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओढे-नाले याला पूर येऊन मोठे नुकसान झाले आहे. त्याविषयी प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. शहरात सध्या अघोषित पाणी कपात सुरू आहे. पालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाने ताब्यात घेतले आहे. आपले त्यावर नियंत्रण नाही. पाऊस पडूनही पुणेकरांना पाणी न मिळत नाही. हडपसर, वडगाव शेरी, कात्रज भागात पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. पुण्यातील खड्डे तसेच आहेत. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत आहे. या समस्यांकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत अशी टीका बराटे यांनी केली.यावर महापौर टिळक यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना खुलासा करण्यास सांगितले. परंतु, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आम्हालाही बोलू द्या अशी विनंती केली. परंतु, महापौरांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी आणि घंटानाद करायला सुरुवात केली. या गदारोळात महापौरांनी तहकुबी पुकारत सर्वसाधारण सभा 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका