शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणूक : कार्यकर्त्यांनी बुक्का फेकल्याने खडकीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:26 IST

महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते.

खडकी - महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते. तेथे उपाध्यक्ष व नगरसेवकांवर काळा बुक्का फेकल्याने वादंगाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणी उपाध्यक्ष चासकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार डेपो लाइन मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती खडकी पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ऊर्फ बंडू चव्हाण, शैलेश गर्गे, मिलिंद खाडे, चेतन गाडे अशी गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. गुन्हे दाखल करून पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खडकी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्या वेळी निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले. स्वागत कक्षाच्या स्टेजवर गर्दी झाल्याने स्टेज कोसळला. स्टेजवरच उपाध्यक्ष चासकर नगरसेवक कांबळे दादा कचरे योगेश कर्नूर आदी कार्यकर्ते होते. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते स्टेजवर आल्यामुळे स्टेज कोसळला़ त्यात नगरसेवक सुरेश कांबळे किरकोळ जखमी झाले. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते स्वत: घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांना धक्काबुक्कीखडकी : मिरवणुकीत पुढे जाण्यावरून दोन गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या बब्रुवान पांडुरंग भोरे या पोलीस कर्मचाऱ्यास कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांसी उद्धट वर्तन करणाºया अभिजित क्षीरसागर, सुमेन तांबोळी, प्रशांत काळे या कार्यकर्त्यांना पोलिांनी ताब्यात घेतले होते. त्यातील अभिजित क्षीरसागर या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKhadkiखडकी