शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पेठांमध्ये होतोय कोंडमारा, चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहने; पार्किंगचा प्रश्न, वाहतूककोंडीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 03:16 IST

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही.

- नम्रता फडणीस/ राजानंद मोरेपुणे : शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. किंबहुना दिवसागणित या समस्येमध्ये वाढच होत चालल्याने पेठांचा कोंडमारा होऊ लागला आहे. वाहतुकीचा बोजवारा उडत चालल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील होऊ लागले आहे.महापालिकेकडून केवळ प्रमुख रस्त्यांचा विचार केला जातोय; मात्र पेठांचा श्वास असलेल्या अरुंद गल्ल्या आणि बोळांमध्ये वाहतूककोंडीच्या उद्भवणाºया समस्यांचे काय? हाप्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.या रस्त्यांवर मूलभूत सोयीसुविधांचा असलेला अभाव आणि वाहनतळामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी असलेली अपुरी जागा या बाबींमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखाही ‘हतबल’ झाली आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शहरातील पेठांचा श्वास असलेल्या गल्लीबोळांमध्ये होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अद्यापही तोडगा निघालेला नाही. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, रविवार पेठ या भागांमध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अरुंद रस्त्यांवर एका बाजूला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा विळखा रस्त्यांना पडलेला दिसला.गणेश पेठेतील संपूर्ण रस्ता वाहनांनी ब्लॉक झाल्याने पादचाºयांना रस्त्यांवरून मार्ग काढणेदेखील मुश्कील झाले होते. नारायण पेठेमध्ये मोदी गणपतीच्या बाजूस तसेच पुणे मराठी ग्रंथालयाच्या मागील बाजूला महापालिकेचा वाहनतळ आहे; मात्र त्याच्या बाहेरच्या बाजूलाच दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर पार्क केल्याचे दिसून आले.लक्ष्मी रस्त्यावरच्या चारशे मीटर अंतरात ‘वॉकिंग प्लाझा’ सुरू करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला एक पत्र दिले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्किंग कुठे असेल, वन वे कुठे करायचा, वाहतुकीचे नियोजन कसे केले जाईल, याचा अभ्यास सुरू आहे. ते झाल्यानंतर वाहतूक शाखेला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.- राजेंद्र राऊत,पथ विभागप्रमुखपेठांमधील रस्त्यांवर मूलभूत सोयीसुविधांचाच मोठा अभाव आहे. वाहनतळांमधली जागा अपुरी असल्याने रस्त्यावर पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. तरीही आम्ही वाहतुकीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यापुढील काळात वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक मनुष्यबळाचा वापर केला जाईल. महापालिका पार्किंग धोरण आणण्याचा विचार करीत आहे, त्याने परिस्थितीत बदल होईल.- अशोक मोराळे,पोलीस उपायुक्तवाहतूक शाखा

टॅग्स :Puneपुणे