शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 23:35 IST

स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या.

वरवंड : स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या. त्यांची आवड आहे त्या ठिकाणी पाठवा. दुष्काळी भगातील माणसांना कष्ट करावयाची तयारी असते. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण चांगले मिळत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.दौंड तालुक्यातील पडवी येथे नागरी सत्कार व विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयसीएससी बोर्डामध्ये ४९५ गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक मिळवणा-या रेवती भरत शितोळे, बँकॉकमध्ये झालेल्या फर्स्ट एशिया तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेल्या साक्षी राजेंद्र शितोळे हिचा सत्कार करण्यात आला.यासोबत ॠतुजा गायकवाड, प्रज्ञा जगताप, प्रणाली बारवकर, प्रतिक्षा शितोळे, अर्चना शितोळे, प्रियंका शितोळे या विद्यार्थींनीचाही सत्कार करण्यात आला. रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्राचार्य डॉ. एल. के. शितोळे यांचाही सत्कार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भरत शितोळे, सरपंच राजेंद्र शितोळे, विजय सुर्यवंशी, नंदकुमार, जनंद्रे निर्मल कुमार देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले, या दोन्ही मुलींनी यश संपादन करीत देशाचे नाव मोठे केले आहे. प्रयत्न करा यश नकी मिळेल. आमदार कुल म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीतून माणूस घडतो हे पडवीकडे पाहील्यास कळते.>गावामध्ये सत्कार होणार हे कळल्यानंतर आनंद झाला. ग्रामीण भाग व शहरी भाग यामधील शिक्षणात मोठी तफावत आहे. आई व वडीलांनी इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:बरोबर स्पर्धा करण्यास शिकवले.- रेवती शितोेळे>उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच यश संपादन करण्यासाठी कष्टाची गरज असते. यश मिळण्यासाठी गावाची व कुटूंबाचा आशिर्वाद असणे गरजेचे आहे. - साक्षी शितोळे

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरPuneपुणे