शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अडथळे आले तरी कार्यरत रहा - डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:31 IST

एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो.

पुणे  - एखादी गोष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर काहीही करता येणे शक्य आहे. प्रत्येक गोष्टीवर सरकारवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारला विविध कारणांमुळे विलंब लागतो. त्यात राजकीय नेते, समाज व सोशल मीडिया यामुळे अडथळे येऊ शकतात. या विलंब काळात आपल्याला खूप काही करता येऊ शकते. आपल्याला नक्की काय करायचे आहे आणि साधने कशी उपलब्ध करता येऊ शकतील याचा विचार करून समाजाने कृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘पोल व्होल्टिंग’ या खेळात शून्यातून सुरुवात करून उंच उडी घ्यायची असते. महत्त्वाकांक्षा ही एखाद्या संधीसारखी असून अडथळे आले तरी ते दूर करत अभ्यासपूर्णतेने कार्यरत राहायला हवे, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ‘पोल व्हॉल्टिंग’ची संकल्पना स्पष्ट केली.पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) च्या वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रवी पंडित यांनी लिहिलेल्या ‘लीप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात माशेलकर व रवी पंडित यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन केले. इस्त्राइलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का व सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया व प्रा. अमिताव मलिक उपस्थित होते.भारत ‘पोल व्हॉल्टिंग’मध्ये कुठे आहे? असे डॉ. माशेलकर यांना विचारले असता त्यांनी शासनाने कोणतीही योजना राबविण्यापूर्वी ग्रामीण भागातले वास्तव नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे याकडे लक्ष वेधले. नियोजनात केवळ सरकारवर अवलंबून राहू नये तर समाजानेही पुढाकार घ्यायला पाहिजे, असे सांगितले. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले.हे फक्त पुस्तक नाही तर महाभारत आहे. सर्वसामान्यांसाठी माहितीचा खजिना आहे. भारत चीनला कसा मागे टाकू शकेल यावर प्रकाश टाकणारे असेल असे वाटले होते. मात्र त्याहीपुढे जाऊन कल्पकपणे जगाचा स्वर्ग कसा बनविता येईल याची अनेक उदाहरणे मला या पुस्तकात पाहायला मिळाली.- अरुण फिरोदिया

टॅग्स :Puneपुणे