शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मावळातील स्थिती : जमिनीचे भाव वाढल्याने नाती दुरावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:26 IST

मावळातील स्थिती : रक्षाबंधनला बहिणी भावाच्या प्रेमाला पारख्या

वडगाव मावळ : मावळात जमिनीला सोन्याचे भाव आल्याने राखी पौर्णिमेच्या पवित्र सणाला भाऊ-बहिणीत दुरावा निर्माण झाला आहे. वडिलांकडून मिळणा-या वारसा हक्काच्या जमिनीवर बहिणी दावा करू लागल्याने त्यांना भावाच्या प्रेमाला पारखे व्हावे लागत आहे.पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाभोवती मावळ तालुक्याचा विस्तार आहे. त्यामुळे मावळातील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. बहिणाला जमिनीचा व संपत्तीचा हिस्सा नाकारणाऱ्या काही भावांमुळे या रक्षाबंधनाच्या पवित्र सणात नात्यामध्ये दुरावा आल्याचे दिसू लागले आहे.

राखी पौर्णिमेच्या सणाला भाऊ-बहिणीला तिच्या सासरी जाऊन बहिणीकडून ओवाळून घेतो. आपल्या अर्थिक क्षमतेनुसार भाऊ तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून साडी, मुलांना कपडे, भेटवस्तू देतो. असे चित्र पूर्वीपासून दिसत आहे. परंतु अलीकडे काही वर्षांपासून काही भावांनी या पवित्र सणाला बहिणींकडे जाण्याचे टाळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वारसा हक्क सोडण्यासाठी दबाव शहर असो किंवा ग्रामीण भाग असो या ठिकाणी जमिनीला सोन्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे. जिकडे तिकडे बांधकामे जोमात सुरू आहेत. काही जमीन मालकांनी स्वत:च्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकणे, अथवा ४० ते ६० टक्क्यांनी त्यांच्याशी भागीदारीत सदनिका, बंगले, रो-हाऊस बांधणे याकडे कल वाढला आहे. या जमिनींच्या व्यवहारासाठी वारस हक्काने बहिणीचे नाव लागल्याने तिच्या सहीला किंवा अंगठ्याला फार महत्त्व आले आहे. बहिणीला हिश्श्याचे पैसे न देण्यासाठी काही भावांनी बहिणीचा तसेच तिच्या पतीला दमदाटी करून वारसा हक्काने उताºयावरील नावे कमी करण्यासाठी प्रयत्नही केला आहे.किमती वस्तूंची भेटगेल्या काही वर्षांपासून राखी पौर्णिमा सणाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी खेड्यापाड्यात जायला वाहनांची सोय नव्हती. बहिणीकडे जाण्यासाठी बैलगाडीतून किंवा पायी जात असत. आता दुचाकी व चारचाकी वाहनांची सोय झाली आहे. जमिनींचे व्यवहार झालेल्या काही कुटुंबात बहिणीला कायदेशीररित्या तिचा समान हिस्सा असल्याने तसेच जमिनीची विक्री करताना काहीही न मागता सही केली. अशा समजूतदार बहिणींना भावांकडून आनंदाने राखी पौर्णिमेच्यानिमित्ताने किमती साडीसह, सोन्याचे दागिने, चारचाकी किंवा दुचाकी वाहने दिल्याची उदाहरणे आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधन