शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 05:34 IST

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कुठे बसवावा याबद्दल मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भुजबळ यांनी विद्यापीठाला भेट देत जागेची पाहणी केली.

ठळक मुद्देपुणे विद्यापीठात ३ जानेवारीला उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील जागेतच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा, अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याची उभारणी करण्याचा राज्य शासनाचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कुठे बसवावा याबद्दल मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भुजबळ यांनी विद्यापीठाला भेट देत जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार समीर भुजबळ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ.संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. महेश आबाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरी नरके यावेळी उपस्थित होते.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील जागेत सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्याबाबत शासन प्रयत्न करेल, असे भुजबळ म्हणाले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रशासनाची आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैैठक घेऊन पुतळा बसविण्यासाठीची आवश्यक कार्यवाही केली जाईल.

‘हेरिटेज’ जागेत पुतळा...nविद्यापीठाची मुख्य इमारत व सभोवतालचा परिसर ‘हेरिटेज’ आहे. मुख्य इमारतीच्या अगदी समोर भुयारी मार्ग आहे. विद्यापीठ इमारतीच्या परिसरात कोणतेही बांधकाम करण्यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. nइमारतीसमोरील मोकळी जागा वनविभागाची आहे. त्यामुळे पुतळा बसवण्यासाठी वन आणि पुरातत्त्व विभागासह राज्यपाल कार्यालयाकडून काही परवानग्या घ्याव्या लागू शकतात. n३ जानेवारीचा मुहूर्त गाठायचा असेल तर कमी कालावधीत अनेक परवानग्या मिळवाव्या लागतील.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळPune universityपुणे विद्यापीठ